ढाणकी प्रतिनिधी -
सामान्य नागरिक अंध विद्यार्थ्यासाठी संवेदनशील असतात. परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारी अंध विद्यार्थ्याची प्रती असंवेदनशील असल्याने डोळस प्रशासनापुढे अंध विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी उपोषणाचा इशारा आपल्या निवेदनातून दिला.
अंध विद्यालयात शिक्षण घेऊन संगीत विशारद पदवी प्राप्त होऊन अंधांना आपल्या हक्कासाठी शासनदरबारी खेटे घालावे लागतात अंध दिव्यांग व्यक्तीसाठी शासनाने नोकरीसाठी चार टक्के आरक्षण देण्यात आली परंतु मागील काही वर्षापासून अंध दिव्यांग विद्यार्थी पुनर्वसनासाठी शासनाचे उंबरठे झिजवत आहेत. या अंध विद्यार्थ्यांना शिक्षण विभागात कला व संगीत शिक्षकांची पदे निर्माण करून अंध दिव्यांग विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करण्यात यावे व यवतमाळ जिल्हा परिषदेमार्फत अपंगासाठी असलेल्या साहित्य वाटप तातडीने करावे ही मागणी घेऊन अंध विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवेदन दिले होते. परंतु त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
मुंबई महानगरपालिकेने शिक्षण विभागाणी संगीत अकॅडमी सुरू करून दिव्यांग अंध व्यक्तीला प्राध्यान्य देऊन संगीत शिक्षकाच्या जागा भरल्या जिल्हा परिषद शिक्षण विभागात संगीत विशारद शिक्षकांसाठी अंध विद्यार्थ्यांच्या प्राधान्य देऊन संगीत कला शिक्षकांची पदभरती करण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून अंध दिव्यांग विद्यार्थी करीत आहेत यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी व शिक्षण विभाग यांना निवेदन देऊन आपली मागणी केली उमरखेड ते आमदार नामदेवराव ससाने हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांना सुद्धा निवेदन देण्यात आली परंतु मागील सात महिन्यापासून अंधांना आपल्या न्याय मागण्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही मागील सात महिन्यापासून अंध व दिवानगी विद्यार्थ्यांना न्याय हक्काच्या मागणीच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली असंवेदनशील लोकप्रतिनिधी व प्रशासनाला अंधांच्या काय भावना कळणार त्यांचे दुःख काय कळणार म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील संगीत विशारद अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या न्याय हक्क मागणी मंजूर करण्यात यावी अन्यथा 26 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा आपल्या निवेदनातून अंध विद्यार्थ्यी ज्ञानेश्वर आहेरकर गांजेगाव विद्यार्थी संघटना राज्य प्रवक्ता व निर्गुण देवराव सूर्यवंशी कुपटी त्यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून दिला.


0 टिप्पण्या