तालुका उपाध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या घरी आ जवळगावकरांनी सांत्वनपर भेट देऊन रोगराई संदर्भात चर्चा केली.

 


दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी 

   हिमायतनगर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजय पाटील सुर्यवंशी यांच्या आजीचे कै गंगाबाई अमृतराव सुर्यवंशी यांचे ह्रृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या पश्चात ५ मुले ,सुना,नातु ,पंतु असा मोठा परिवार आहे.त्या सेवानिवृत्त AE (MSEB) पंडीतराव अमृतराव सुर्यवंशी,से.स.सो मा चेअरमन तानाजी सुर्यवंशी, विनायक,माधव,रंगराव सुर्यवंशी यांच्या आई आहेत.त्या निमित्ताने आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी २२ आॅगस्ट रोजी खडकी बाजार येथे येऊन सुर्यवंशी कुटुंबियांचे सांत्वन करुन धिर दिला.

 गावात आल्या कारणाने एवढ्या दु:खद प्रसंगी तालुका उपाध्यक्ष विजय सुर्यवंशी यांनी गावात तथा  तालुक्यात व ग्रामिण भागात प्रामुख्याने खडकी बा‌.सवना ज.दरेसरसम,सरसम,धानोरा ज.करंजी दिघी,वाघी कामारी,विरसणी या सह इतर गावात थैमान घातलेल्या साथीच्या रोगाच्या समस्येवरती आमदार साहेबांचे लक्ष वेधले.हे त्यांच्या विचारांचे मोठेपण ठरते.याची तात्काळ दखल घेत जिल्हा हिवताप आरोग्य अधिकारी डाॅ किशोर देशमुख यांना भ्रमनध्वनीवरुन खडकी बा गावांसह ग्रामिण भागात डेंग्यू, मलेरिया, हिवताप निर्मुलनासाठी धुळ फवारणी करणे,गप्पी मासे सोडणे व इतर उपाय योजना करण्याचे आदेश दिले.

  यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर, सुभाष राठोड,अ.अखिल, संजय माने,अश्रफ खान, गणेश शिंदे, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, बाकी सेट,डॉ परभणकर, देवराव पवार, सरपंच पति संजय सुर्यवंशी,अनिल पवार,लक्ष्मन पाटील, देविदास सुर्यवंशी, पंजाब पाटील ,थोंबाळे साहेब, पांडुरंग गाडगे, शेख मुजिब यांच्या सह गावातील नागरिकांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या