शहरात फॉगिंग मशीन त्वरित फिरवन्याची शिवसेनेची मागणी. अन्यथा आंदोलन छेडणार

 


ढाणकी प्रतिनिधी - 

ढाणकी शहरात सध्या सर्व खाजगी दवाखाने रुग्णांनी भरलेले असून,  सर्दी,  खोकला,  ताप या आजाराने शहरात थैमान घातले आहे.  जिकडे पाहावे तिकडे फक्त रुग्ण दिसत आहेत.  अश्या या स्थिती मुळे अजून कोणती रोगराई शहरात येण्याचे नाकारता येत नाही.  शहरात दिवसेंदिवस डासांचे प्रमाण सुद्धा वाढत असल्याने त्वरीत फॉगिंग मशीन फवारण्याची मागणी आज शिवसेना शहर ढाणकी ने मुख्याधिकारी ढाणकी यांना निवेदनाद्वारे केली आहे.  शहरात मोठ्या प्रमाणात अस्वचता वाढत असून नगरपंचायत म्हणावे तसें प्रयन्त करताना दिसत नाही आहे.  बऱ्याच जागी पाणी साचत राहत असल्याने डेंगू ची साथ सुद्धा शहराला विळखा घालू शकते. ज्या विहिरीतून शहराला पाणी पुरवठा होतो त्या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्याची मागणी सुद्धा निवेदनातून करण्यात आली.  एकंदरीत या सर्व बाबीचा विचार करून यावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना आता पुढे सरसावली आहे.  वरील कामे जर त्वरीत झाली नाहीत तर शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा सुद्धा या वेळी देण्यात आला. निवेदन देते वेळी शिवसेना शहर प्रमुख बंटी भाऊ जाधव, शिवसेना व्यापारी आघाडी तालुका प्रमुख अरविंद सूर्यवंशी,  युवासेना तालुका प्रमुख संभाजी गोरटकर, अल्पसंख्यांक ता. प्रमुख एजाज पटेल,  युवासेना तालुका उपप्रमुख विशाल नरवाडे,  कोअर कमिटी सदस्य रमेश गायकवाड,  शिवाजी फाळके,  दिलीप नंदनवार, प्रशांत जोशी, अभय सोनुने,  बाळू करकले,  बंटी फुलकोन्डवार,  व शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या