दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी
आपल्या पाल्यांना शिक्षण देत असताना वाचनाला विशेष महत्त असुन त्याबरोबरचं विज्ञानाच्या धड्यातून तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणे देखील गरजेचे असल्याचे विज्ञान प्रयोग शाळेच्या आयोजित प्रसंगी साईनाथ कोथळकर यांनी व्यक्त केले.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शाळेचे वर्ग बंद झाल्यामुळे विद्यार्थी सध्या घरीच असुन दोन वर्षांत विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचे कोरोना काळात क्लासेस घेऊन कोथळकर यांनी ज्ञानार्जनाचे धडे दिले. कारला येथील प्रगती क्लासेस मध्ये शाळे प्रमाणे शिक्षण देत कोरोना महामारीत देखील बंद असलेली शाळा गावातील क्लासेस मुळे आजही सुरू च असल्याचे वास्तव कोथळकर यांनी ठेवले त्यांच्या कार्याबद्दल कारला येथील ग्रामस्थ व पालकांनी कौतुक केले आहे.
स्वातंत्र्य दिनी क्लासेस मध्ये विज्ञान प्रयोग शाळेचे आयोजन केले होते. कारला गावातील लहान लहान बालकांनी, विज्ञानातील काही प्रयोग करून सर्वां समोर एक आदर्श ठेवला, आपल्या बुद्धीच्या बळावर, आणि शिक्षकाच्या मार्गदर्शनाने, अनेक साधने तयार केली होती.गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देखील देण्यात आले आहेत. या प्रसंगी साईनाथ कोथळकर म्हणाले की विज्ञान प्रयोगामुळे निसर्गाचा पर्यावरण संमतोल कसा, ठेवला पाहिजे पाण्याच्या वापर कसा केला पाहिजे या बद्दल ही त्यांनी उपयुक्त असे प्रकल्प तयार करून याबद्दल योग्य मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे ग्रा. पं. सदस्य सोपान बोंपीलवार,
नागेश कोथळकर, अगंद सुरोशे, गजानन कदम, पर्यवेक्षक अमोल गोखले, ओम मोरे, मारोती पा. कदम, अमोल सुरोशे यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या