हिमायतनगरात बजरंगदलची श्रावण कावड यात्रा भरपावसात दणाणली . कावडधारि युवकांनी परमेश्वरासह विविध देवी देवतांचे घेतले दर्शन.

  


हिमायतनगर प्रतिनिधी - दाऊ गाडगेवाड

दरवर्षी प्रमाणे यंदा श्रावण मासानिमित्य निघणारी बजरंग दलाची कावड यात्रा मोठ्या उतशात काढण्यात आली. दुचाकीवरून निघाली आणि सहस्त्रकुंड ते वाढोणा येथे परत दुचाकीवर आली. शहरात येताच जय श्रीरामाच्या नामघोषणाने कावड यात्रेचे स्वागत झाले असून, दरम्यान पाऊस सुरु असल्याने बनायेंगे मंदिर... कसम तुम्हारी राम... प्राणो से प्यारा है, मुझे चढ़गया... भगवा रंग रंग... या गीताने दणाणून निघाली.  


श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी म्हणजे दि.३० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता येथील श्री परमेश्वर मंदिरातून कावड यात्रा सहस्त्रकुंड कडे रवाना झाली. या ठिकाणी प्रथम पैनगंगा नदीमध्ये स्नान करून महादेवाचे दर्शन घेऊन जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर हर हर महादेव....जय श्रीराम नामाचा जयघोष करत परत कावड यात्रा मोटार सायकलद्वारे हिमायतनागर (वाढोना) नगरीत निघाली. शहरात कवाड यात्रा दाखल झाल्यानंतर गावकर्यांनी जलोषात स्वागत केलं. यावेळी युवकांनी शहरातील सर्व देवीदेवतांची दर्शन घेऊन श्री परमेश्वर मंदिराच्या चरणी जल अर्पण करून आपल्या आई वडीलाच्या पायावर जल टाकून आशीर्वाद घेतले अशी माहिती बजरंगदल तालुका संयोजक गजानन चायल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  


कवाड यात्रा काढण्याहची ही दरवर्षीची परंपरा यावर्षी सुद्धा बजरंग दलाच्या युवकांनी जोपासली असून,  कावढं यात्रा दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी  पोलीस बंदोबस्त लावला होता. स्वतः पोलीस निरीक्षक रहदारीसाठी होणार अडथळा दूर करण्यासाठी भर पावसात कार्यरत असल्याचे दिसून आल्याने अनेकांनी पोलीस निरीक्षक भगवन कांबळे यांच्यासह एका  पोलिस कर्मचाऱ्याच्या कर्तव्यदक्षतेचं अभिनंदन केलं. तर काही पोलीस अधिकारी व कर्मचारी पावसात कपडे भिजतील यामुळं शेडखाली उभे राहून तर काहीजण वाहनातून यात्रेदरम्यान मिरवणुकीवर नियंत्रण ठेऊन असल्याचे पाहावयास मिळाले आहे. एकूणच आजची हि कावड यात्रा शांततेत काढल्याने पोलीस प्रशासनाने बजरंगी युवकांचे अभिनंदन केले. त्यानंतर कावड यात्रेचा समारोप परमेश्वर मंदिरात भोजनानंतर करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या