बिटरगांव प्रतिनिधी -कमलाकर दुलेवाड
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणाऱ्या कोंघारा येथील कृषी महाविद्यालय पांढरकवडा येथील कृषिदुत योगेश कैलास चव्हाण यांनी यवतमाळ मध्यवर्ती सहकारी बँक ढाणकी शाखेला भेट दिली.यावेळी यवतमाळ मध्यवर्ती सहकारी बँक शाखेचे व्यवस्थापक अजय नाईक यांनी शेतकरी यांना मिळणारे पीक विमा, पीक कर्ज,त्यांचे व्याजदर व शेती विषयक अनेक योजना बदल माहिती दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी कृषी महाविद्यालय कोंघाराचे प्राचार्य महेश राठोड कार्यक्रम अधिकारी विशाल थाकडे अर्थशास्त्र प्राध्यापक शुभम शिरपुरकर, व यवतमाळ मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी सुभाष जाधव,विशाल राठोड,कलाणे पाटील, उपस्थित होते.

0 टिप्पण्या