नाईकडा जमातीला खावटी मिळालीच पाहिजे रंगराव काळे .अध्यक्ष, बिरसा क्रांती दल महा.राज्य

 


उमरखेड तालुका प्रतिनिधी -मारोती गव्हाळे 

कोरोना महामारी च्या काळात महाराष्ट्र शासनाने आदिवासी समाजाला चार हजार रुपये खावटी देण्याचा  निर्णय होऊन एक वर्षा पेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. पण सर्वच गरजू आदिवासी जमातीला आदिवासी विभागाकडून खावटी मिळाली नाही. यवतमाळ जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय पुसद अंतर्गत दारव्हा, दिग्रस, आर्णी, महागाव, उमरखेड, व पुसद या तालुक्यांमध्ये अतिदुर्गम भागात आदिवासी नाईकडा जमात वास्तव्य करून राहते. या जमातीला अद्याप पर्यंत प्रकल्प कार्यालय पुसद यांनी खावटी दिली नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी भिल्ल नाईकडा समाजाचे शिष्टमंडळ माननीय रंगरावजी काळे (माजी शिक्षणाधिकारी ,तथा बिरसा क्रांती दल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष) यांनी आज प्रकल्प कार्यालय येथे भेट दिली. नाईकडा जमातीला खावटी मिळाली पाहिजे याविषयी सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.अहिरे साहेब यांच्यासोबत शिष्टमंडळासह दीड तास चर्चा केली. नाईकडा जमात ही आदिवासी जमात आहे त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी आपण त्यांच्या जमाती विषयी सखोल चौकशी करावी. नाईकडा जमातीकडे जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध आहेत. ते मूळ आदिवासी आहेत. यांना खावटी मिळाली पाहिजे यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली. अहिरे साहेब यांनी संबंधित लिपिक यांना आपल्या कक्षात ताबडतोब बोलावून नाईकडा जमातींना लवकरात लवकर खावटी मिळण्याबाबत प्रकल्प कार्यालय पुसद यांनी वेळोवेळी वरिष्ठांना कळविले आहे, त्यांना लवकरच खावटी मिळेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. नाईकडा जमातीला एटीसी कार्यालय अमरावती कडून अप्रोल मिळाल्या बरोबर मी नाईकडा जमातीच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्षणाचाही विलंब न करता रक्कम जमा करतो असा शब्द त्यांनी नाईकडा समाजाच्या शिष्टमंडळाला दिला. यावेळी बिरसा क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष डीबी अंबुरे उमरखेड, नारायणराव पिलवंड , सुधाकर मित्तक, हरनाबाई पेजेवाड, दत्ता पीलवंड, राजू पिटलेवाड, सुदाम तारमेकवाड

गजानन पिटलेवाड, गजानन फोपसे, दादाराव चिरंगे , भास्कर मुकाडे, सुरेश  हातमोडे,बापुराव मुदेवाड,लक्ष्मीबाई हातमोडे,सोनाबाई जेवलेवाड, राधाबाई जंगमवाड, दिगंबर पेजेवाड ,अंबिका खरात इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या