दाऊ गाडगेवाड हिमायतनगर
मागील चार ते पाच वर्षापासून मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील हवामान तज्ञ पंजाबराव डख हे हवामानाचा अचूक अंदाज वर्तवतात हे वेळोवेळी सिद्ध झाले असून त्याचा चांगलाच फायदा शेतकऱ्यांना झाला असल्याने शासनाने त्यांचा सन्मान करून त्यांना मानधन चालू करावे अशी मागणी हदगाव -हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केली आहे.
हवामान तज्ञ पंजाबराव डख हे मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील रहिवासी असून ते मागील चार ते पाच वर्षापासून हवामानाचा अंदाज अचूक पणे वर्तवतात शेतकऱ्यांना मार्गदर्शन पर मेळावे आयोजित करून त्यांनी हवामानाची अचूक परिस्थिती सांगितल्याने त्याचाच फायदा शेतकऱ्यांना झाला असून मराठवाड्यातील कानाकोपऱ्यात असणारे शेतकरी हवामान तज्ञ डख त्यांच्या संपर्कात राहून हवामानाची परिस्थिती जाणून घेतात त्यामुळे विनामूल्य शेतकऱ्यांची सेवा करणाऱ्या पंजाबराव डख यांचा सन्मान करून त्यांना शासन स्तरावरून तात्काळ मानधन चालू व्हावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
हवामान खात्याचा अंदाज अचूकपणे वर्तवण्यासाठी वेद शाळेवर शासनाचा मोठा निधी खर्च होत असतो असे असतानाही वेधशाळेचा अंदाज कधी कधी चुकीचा ठरला जातो परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होते परंतु मराठवाड्यातील हवामान तज्ञ डख यांचा हवामानाचा अंदाज वेळोवेळी खरा ठरल्याचे अनेक वेळा सिद्ध झाल्याने शासनाने याची दखल घ्यावी असेही आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कडून सांगण्यात आले.
मागील महिन्यात हादगाव तालुक्यातील निवघा येथे पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना मार्गदर्शन पर कार्यक्रम पार पडला होता त्या कार्यक्रमात त्यांनी ऑगस्ट महिन्यात सोळा तारखेपासून पावसाला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला होता तो खरा ठरला असल्याने शेतकऱ्यांत विश्वासाची भावना निर्माण झाली त्यामुळे हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या या हवामान तज्ञाला तात्काळ मानधन चालू करण्यासाठी लवकरच मंत्री महोदय यांची भेट घेणार असल्याचे आमदार जवळगावकर यांनी सांगितले.
0 टिप्पण्या