ढाणकी प्रतिनिधी
श्रद्धेय अड बाळासाहेब आंबेडकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राजकारणात सक्षम असा तिसरा पर्याय म्हणून उदयास आलेल्या, मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लक्षनिय मते घेऊन प्रस्थापित राजकीय पक्षांच्या मनात धडकी भरवणाऱ्या ,सर्व जाती धर्मातील समूहातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या , गाव तिथे शाखा, ,घर तिथे कार्यकर्ता, या अभियानांतर्गत ग्राम शाखेचे फलकाचे अनावरण सोहळा दिनांक 20/08/2021 रोज शुक्रवार मौजा पिरंजी ता.ऊमरखेड जि.यवतमाळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला,, वंचित बहुजन आघडीचे जिल्हा महासचिव जाँन्टीभाऊ विनकरे,, उमरखेड तालुका प्रमुख संतोष जोगदंडे , ढाणकी नगर पंचायत चे नगरसेवक संबोधी गायकवाड,समता सैनिक दलाचे मार्शल विनोद बरडे (सर)
राजेश खंदारे( जेष्ठ कार्यकर्ते)
यांच्या प्रमुख उपस्थितीत पिरंजी येथे, वंचित बहुजन आघाडी ग्राम शाखेची स्थापना करण्यात आली या वेळी महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून उपस्थित गावकऱ्यांना प्रमुख पाहुणे कडून मार्गदर्शन करण्यात आले,, या वेळी पिरंजी शाखा प्रमुख पदी सुधाकर कदम,उपाध्यक्ष पदी दलित कांबळे,सुनील मुरमुरे,,सचिव पदी गणेश काळबांडे,बालाजी दवणे, कोषाध्यक्षपदी गंगाराम दवणे, सहसचिवपदी पांडुरंग डुकरे, सल्लागारपदी विनोद दवणे, देवा पाईकराव, संघटकपदी विकास ठोके, सह सतीश दवणे, कार्याध्यक्षपदी दत्ता झिंझाडे ,या सह सदस्य पदी दीपक झळके,भाऊराव ठोके,बबन धुळे,राजू धुळे ,संदीप कदम, धम्मानंद भालेराव ,गजानन पाईकराव,भीमराव कांबळे, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची सदस्य पदी निवड करण्यात आली,या वेळी करंजी येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिरंजी येथील सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या