शिरपल्ली ते गांजेगाव पुलापर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण करा अन्यथा शिरपल्लीकरांचे १५ ऑगस्ट ला तहसील कार्यालया समोर उपोषण.

 


दाऊ गाडगेवाड- हिमायतनगर प्रतिनिधी 

तालक्यातील शिरपल्ली ते गांजेगाव  पूल  असा जिल्हा परिषद अंतर्गत  खडीकरन झालेला रस्ता होता.  दिनांक २१/०७/२०२१ रोजीच्या मुसळधार पावसाने  वाहून गेला.  शेतकऱ्यांना शेती कामाकरिता  व विदर्भात जाण्याकरिता अवघड झाले आहे.  १४ ऑगस्ट पूर्वी  या रस्त्याचे मजबुतीकरण न केल्यास  आम्हा शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना लोकशाही मार्गाने १५ ऑगस्ट पासून  अमरण उपोषण तहसील समोर करावे लागेल  असा इशारा निवेदनाद्वारे  तहसीलदार यांना दिला आहे. 

 निवेदनावर भास्कर जाधव,  बाळू जोगवड, माधव हांडे,  कल्याण चव्हाण, दत्ता ढवळे यांच्या बरोबर समस्त गावकऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. शिरपल्ली ते गांजेगाव रस्त्याचे मजबुतीकरण झाल्यास  उमरखेड आगाराची बस सेवा  ढाणकी मार्गे हिमायतनगर  सुरू होऊन शिरपल्ली , शिलोडा,   डोलारी, पळसपुर,   आदी गावातील नागरिक व शाळकरी मुलांना  फायदा होणार आहे.  

 तहसीलदार - डी एन गायकवाड-  यांनी कार्यकारी अभियंता उत्तर विभाग नांदेड  दिनांक 12/ 8 /2021  ला पत्र देऊन भास्कर जाधव,  व इतर 47 व्यक्ती  यांना 14/ 8/2021  कार्यालयात प्राप्त झाला असून  शासनाच्या निर्णयानुसार त्वरित कारवाई करावी.  अर्जदारास 14 पूर्वी रस्ता मजबुतीकरण  न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी  उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.   या निवेदन धारकांना  उपोषणापासून परावृत्त करावे  व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल  अर्जदारास कळवावे  असे म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या