पावसा अभावी पिके कोमेजुन जात आहेत हिमायतनगर तालुक्यातील चित्र.


दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी 

कधी प्रचंड पाऊस तर कधी पावसातील दीर्घकाळ पडलेला पावसाचा खंड, अश्या एक नाही अनेक प्रश्नाला तोंड देत, बळीराजा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जगतो आहे.

हिच भयावह परिस्थिती हिमायतनगर तालुक्यातील खरीप पिकांची आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाला पिकांची उगवण चांगली झाली. अगदी थाटाने पिके डोलत आसतांना गेल्या वीस ते बावीस दिवसापासुन पाऊसाने चक्क पाठ फिरवली . हातातोंडाशी आलेला मुग, उडीद तर गेले. परंतु सोयाबिन फुल अवस्थेतुन शेंग परिपक्व होत असतांना पाऊसच पडत नाही. त्यामुळे शेतक-यांची प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे.

कधी जास्त पावसाने, तर कधी पावसातील पडलेला खंड हे प्रश्न शेतकर्‍यांची पाठ सोडत नाहीत. ३६०० ते ४००० रुपये किंमतीच्या सोयाबीनची पेरलेली बॅगची हि अवस्था पाहून शेतकरी हतबल झाले आहेत.


ईफको टोकियो कंपनीने पिक विमा दिला नाही.

गेल्या २०२० मधील खरीप हंगामात पिकांचे पावसाने प्रचंड नुकसान होऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही. यावर्षीही कंपनी झोपेचे सोंग घेत असतांना दिसते आहे.

बाबुराव कदम कोहळीकरांचा कंपनीला एल्गार

येत्या १६ आॅगष्ट पासून लोकनेते बाबुरावजी कदम हे पिक-विमा कंपनी विरोधात आंदोलन करणार आहेत. नेहमीच शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत धडपड करीत असतात. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. आणि हदगाव-हिमायतनगर शेतकरी बांधवांना दिलासा दिला. तसेच हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी प्रत्यक्ष शिवारफेरी करुन पिकांची अवस्था बघावी. आणि शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळवुन द्यावी अशी आग्रही मागणी शेतकरी बांधव करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या