दाऊ गाडगेवाड- हिमायतनगर प्रतिनिधी
मो. 9921572936
हिमायतनगर तालुक्यातील भिश्याचीवाडी येथील महिला वार्षिक सनापैकी महिलांचा एक श्रावण महिन्यातील मुख्य सण मानला जाणारा नागपंचमीच्या दिवशी महिला थेट पोलीस स्टेशनला..
गावात मोठया प्रमाणात अवैध गावठी व देशी दारुची विक्री वाढल्याले अनेक कुटूंबाच्या घरी सुखाची चूल पेटत नाही.
सध्या शाळा कॉलेज बंद असल्यामुळे देशाचे भविष्य असलेली नव तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे व शाळकरी मुलावर सुद्धा याचे संस्कार पढत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या करोनामुळे सगळी जनता हवालदिल झाली आहे त्यामुळे हातावर पोट असलेली व्यक्ती दररोज कामाला जाऊन मिळालेल्या पैश्यात दारू पीत आहे त्यामुळे महिलांच्या मनात प्रश्न पडला कि संसार कसा चालवावा...
या अवैद्य धंदे चालवणाऱ्यांवर वचक ठेवण्यास पोलीस प्रशासन कमी का पढत आहे हाही एक चर्चेचा विषय बनत चालला आहे. त्या मुळे ह्या सर्व बाबी लक्षात घेत महिलांनी पुढाकार घेऊन अवैध दारू विकणाऱ्या आरोपीला स्वतः पकडून आणून ठाणेदारांच्या हवाली केले व पुन्हा हे धंदे बंद व्हावे म्हणून पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांना निवेदन देण्यात आले.

0 टिप्पण्या