निंगनूर पाझर तलावाने घेतला बळी. तलावात तरुणाचा बुडून मृत्यू.-LOKमानस

 


ढाणकी प्रतिनिधी -

           उमरखेड तालुक्यातील   निंगणुर पाझर तलावांमध्ये निंगणूर येथील रुपेश राजू राठोड वय 33 वर्ष पाेहायला गेला असता त्यांचं अंदाजे 1 .30 मिनिटांनी पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला    निंगणुर येथील पोलीस पाटील उत्तम मुडे यांनी बिटरगाव पोलीस स्टेशनला फोनद्वारे कळविले असता बिटरगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायभाये व निंगणुर बीटचे जमादार दत्ता कोसराम हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी घटना स्थळाची पाहणी करून निंगणूर येथील माजी सरपंच ब्रिजूलाल मुडे यांच्याशी चर्चा करून निंगणूर येथील पट्टीचे पोहणारे लक्ष्मण  जाधव, उत्तम खांडेकर, अनिल गणपत मुडे, संदीप जेमु चव्हाण यांनी बिरजलाल मुडे व बिटरगाव पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक  राम किसन जयभाये यांच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रमाने 4वाजून 30 मिनीटांनी त्यांचा मृत्य देह हाती लागला पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी येथे पाठवण्यात आला  . मृत्तक रुपेशला जन्मतःच एक किडनी होती ती ही बाधीत होती त्यामुळे रुपेश हा नेहमीच आजारी असायचा त्याच्या अपघाती मृत्यूमूळे गावात हळहळ व्यक्त होत आहे . पुढील तपास बिटरगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राम किसन जायभाये व पोलीस शिपाई दत्ता कुसराम करीत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या