ढाणकीत खा राजीव सातव यांना सर्व पक्षीय श्रद्धांजली.- LOK मानस



ढाणकी प्रतिनिधी 

खासदार राजीव सातव यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे.  एक तरुण तडफदार,  अभ्यासू नेता गमावल्याच्या प्रतिक्रिया जनसामान्यांमधून येत आहेत.  त्यांच्या निधनाने ढाणकी शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शोक व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरातील सर्व पक्षीय नेत्यांनी शोकसभेचे आयोजन केले होते. 

स्व. खासदार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरातील सर्व पक्षच्या शहर प्रमुख,  पदाधिकारी, कार्यकर्ते,  नगरसेवक,  प्रतिष्टीत नागरिक यांनी हजेरी लावली होती. 

 स्व राजीव सातव यांच्या जीवनावर प्रकाश टाकत असताना  ढाणकी शहराकरिता केलेल्या कामाची आठवण काढल्या जात होती. हिंगोली लोकसभा मतदार संघात  यवतमाळ जिल्ह्यातील फक्त उमरखेड तालुका येत असल्याने ढाणकी शहरातून लोकसभेच्या मतदानात राजीव सातव यांना लीड दिल्याने त्यांचे ढाणकीकरावर विशेष लक्ष देऊन विकास कामे मार्गी लावण्यात सातव साहेब मदत करत होते. राजीव सातव साहेब खासदार असताना पासून ढाणकी करांसोबत जुळलेली नाळ आज पर्यंत कायम होती. राजीव सातव यांच्याकडे कोणतंही काम ढाणकी कर घेऊन गेल्यास त्यांचे बाकी सर्व कामे बाजूला सारून पहिले ढाणकी येथून गेलेल्या नागरिकाचे काम करून देत असत मग तो कोणत्याही पक्षाचा आहे याचा विचार राजीव सातव यांनी केला नाही. यासह अनेक आठवणी काढून प्रत्येक पक्षातील शहर अध्यक्ष  यांनी राजीव सातव यांना  श्रद्धांजली वाहिली  तर काही वक्त्यांनी  राजीव सातव यांच्या जीवनावर प्रकाश टाकत असताना त्याना  आश्रू अनावर झाले.  राजीव सातव यांच्या दुःखद निधनाची  बातमी  अनेकांच्या मनाला चटका लावून  गेली. खासदार सातव यांच्या अचानक जाण्याने देशाने एक युवा नेतुत्व गमावल्याची  सुद्धा प्रतिक्रिया सुद्धा यावेळी मान्यवरांनी दिल्या. शोकसभेचे    सूत्रसंचालन हमीद भाई यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व शहर वासीयांनी उभे राहून दोन मिनिटं मौन पाळून खा सातव यांना श्रद्धांजली वाहिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या