ढाणकी प्रतिनिधी - ढाणकी शहरातील शिक्षक कॉलनी मध्ये मागील वीस वर्षापासून सुरळीत नळयोजनेतुन पाणी पुरवठा होत नसल्याने तेथील रहिवासी त्रस्त झाले आहेत.
उन्हाळा सुरु झाला की ढाणकी शहराला पाणी टंचाईची समस्या नेहमीच जाणवत असे. मात्र गेल्या वर्षी पासून ढाणकी नगरपंचायत झाल्याने ही समस्या काही प्रमाणात मिटली परंतु फुलसावंगी फाटा येथे असलेल्या शिक्षक कॉलोनी ला याचा फायदा झाला नाही. तब्बल 20 वर्षांपासून येथील नागरिकांना नळाचे व्यवस्थित पाणी येत नाही.
या संदर्भात येथील नागरिकांनी प्रथम ग्रामपंचायत होती तेव्हा आणि आता नगरपंचायत असतानाही बरेच वेळा विनंती अर्ज सादर केले मात्र तरीही समस्या सुटली नाही. एरव्ही ठीक आहे मात्र उन्हाळ्यात बोरवेल सुद्धा कोरडे पडल्याने पाण्याची गंभीर समस्या त्यांना जाणवू लागली. ज नगरपंचायत शिक्षक कॉलनी मधील नागरिकांना दर वर्षी पाणी कर आकारते मात्र व्यवस्थित पाणी पुरवठा करत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ह्या समस्ये विषयी जेव्हा काँग्रेस चे शहर अध्यक्ष अमोल तुपेकर यांना कळाले तेव्हा त्यांनी ताबडतोब नागरिकांना भेटून समस्या जाणून घेतली आणि त्या संदर्भात निवेदन तयार करून नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले. अमोल तुपेकर यांच्या कार्यतत्परते मुळे शिक्षक कॉलनी मधील नागरिक समाधानी झाले आहेत. शिक्षक कॉलनी मधील पाईप लाईन चे काम लवकरात लवकर झाले नाही तर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा अमोल तुपेकर यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदन सादर करते वेळी उपनगराध्य जहीर भाई, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती वसंतराव उर्फ बाळू पाटील चंद्रे, शिवसेना शहर प्रमुख बंटी जाधव, पाणीपुरवठा सभापती संबोधी गायकवाड, ओमा पाटील चंद्रे उपस्थित होते.

0 टिप्पण्या