बिटरगांव प्रतिनिधी -कमलाकर दुलेवाड
बिटरगाव बु. परिसरात मन्याळी शिवारात बिबट्याने गायीची शिकार केल्याची घटना बुधवारी सकाळी समोर आली.
येथील शेतकरी दिगांबर संभाजी वाघमारे मन्याळी शिवारात यांच्या मालकीची गाय शेत सर्वे नंबर २८९/१ मध्ये संध्याकाळी गाय चराई करुन आल्यावर शेतकऱ्यांनी गाय शेतामधील शेडवर बांधून संध्याकाळी घरी गेल्यानंतर सकाळी शेतात आल्यावर गाय दिसेनासी झाल्यावर गायचा शोध घेतल्यानंतर गाय ही शेजारी शेतात मृतावस्थेत आढळून आली.
यावेळी तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्यानी संधी साधून गायीची शिकार मध्यरात्री केल्याचा अंदाज आहे. या आधी सुध्दा बिबट्यानी या भागातील शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांची शिकार केल्याची घटना समोर आली त्याच प्रमाणे या भागात गुराखी व मध्यरात्री गावात येऊन मानवी वस्तीत हल्ला केल्याची घटना घडली असुन बिबट्याची व वाघाची दहशत पसरली आहे. बिटरगाव बु. वन परिक्षेत्र कार्यालय येथे शेतकरी दिगांबर वाघमारे यांनी लेखी तक्रार दाखल केली व पशुवैद्यकीय दवाखाना बिटरगाव बु. येथे तक्रार दाखल केला असुन बिटरगाव बु. वनपरिक्षेत्र कडुन दिगांबर वाघमारे यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहेn

0 टिप्पण्या