बकरी ईद घरीच साजरी करा. -ठाणेदार विजय चव्हाण


ढाणकी प्रतिनिधी - उदय पुंडे 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या उमरखेड उपविभागातील महागाव व उमरखेड तालुक्यातील संपूर्ण संचारबंदी चालू असून कोणत्याही नागरिकास बाहेर निघण्याची परवानगी नाही.  त्यामुळे उद्याची बकरी ईद सुद्धा मुस्लिम बांधवानी आपापल्या घरातच नमाज अदा करून साजरी करावी.  असे आवाहन बिटरगांव पोलीस स्टेशनं चे ठाणेदार विजय चव्हाण यांनी मुस्लिम बांधवाना केले आहे. 
ढाणकी त सुद्धा कोरोनाचे काही रुग्ण पॉसिटीव्ह आढळल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे.  ढाणकीतील काही भाग सुद्धा त्यामुळे सील केला गेला असून कोरोनाला अटकाव करण्यासाठी पोलीस प्रशासन  प्रयत्न करत आहे.  
शांत व संयमी व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले ठाणेदार विजय चव्हाण आपल्या कार्यप्रणाली नेहमी चर्चेत असतात.  त्यांनी शहरातील अनेक अवैध धंद्या वाल्यांच्या मुसक्या आवळल्याने ढाणकी व परिसरातील गुन्हेगारी चा स्तर सुद्धा खुप कमी झाला आहे. ठाणेदार विजय चव्हाण यांनी मुस्लिम बांधवांची बैठक घेऊन शासनाकडून बकरी ईद संबधी आलेले निर्देश समजावून सांगितले व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. 
कोणीही नमाज अदा कार्यासाठी इदगाह वर न जाता घरीच अदा करावी व कुर्बानी देताना सुद्धा काळजी घ्यावी असे त्यांनी आवाहन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या