शेतात जागलीला गेलेल्या युवकाचा खून करून आरोपी पोलिसांपुढे शरण


उमरखेड तालुक्यातील मन्याळी येथे शेतात जागलीला गेलेल्या युवकाचा  मध्यरात्रीनंतर धारदार चाकूने खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. शेताच्या शेजारी असलेल्यानेच खून केल्याची कबुली बिटरगाव पोलिसांपुढे दिली. अमोल निवृत्ती काळबांडे (28) असे मृताचे नाव आहे. अमोल हा त्याच्या शेताच्या शेजारी असलेल्या शरद मनोहर सावतकर (25) याच्यासोबत जागलीला गेला होता. दोघेही आपापल्या शेतात जागल करत होते. दरम्यान, मध्यरात्रीनंतर शरद सावतकर यांनी अमोल वर धारदार चाकूने सपासप वार केले. यात अमोलचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी शरद हा थेट स्वतःहून बिटरगाव पोलिस ठाण्यात पोहोचला. त्यांने  पोलिसांना फुलाचीफुलाची माहिती खुनाची माहिती दिली. त्यानंतर बिटरगावचे ठाणेदार विजय चव्हाण व पथकाने घटनास्थळ गाठले. तीन दिवसापूर्वी आरोपी शरदच्या वडिलांचे व अमोल मृताचे वाद झाल्याची माहिती आहे. याच वादाचा वचपा काढण्यासाठी शरद नी अमोलचा खून केला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. अगदी शुल्लक कारणावरून जिवानिशी मारण्याचा प्रकार घडल्याने बिटरगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या