अबब... झाडाला फुटले केस



स्पेशल रिपोर्ट -उदय पुंडे 
Mo. 8855814422

ढाणकी पासून जवळच असलेल्या पैनगंगा अभयारण्यात डोंगरगाव येथे सागाच्या झाडाला केस सदृश आढळल्याने नागरिकांत आश्चर्याचे वातावरण होते. 
सविस्तर वृत्त असे की कुरुळी जंगलातील डोंगरगाव येथे नदीच्या काठाजवळ काही सागाच्या झाडाला केसासारखा पदार्थ तेथे गुर चरणाऱ्या गुराख्याला आढळले.  त्याला आश्वर्याचा धक्का च बसला.  त्याने लगबगीने गावात येऊन ही बातमी लोकांना सांगितली आणि ते पाहण्या साठी तेथे सर्व गाव जमा झाले.  काही लोकांनी तर त्या झाडाची पूजा सुद्धा केली.  हळूहळू ही बातमी वॉट्सअप च्या माध्यमातून वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली.  
        या बातमीची शहानिशा करण्यासाठी आमची गावाकडच्या बातम्या न्यूज ची टीम डोंगरगावात दाखल होऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता झाडाला छोटे छोटे केसासारखा पदार्थ आढळला.  त्यांचा नमुना घेऊन तो वन अधिकाऱ्यांना दाखवला असता त्यांनी पावसाळ्यात नदी काठाच्या झाडाला असला पदार्थ उगवतो.  व तो केस नसून मुळाचा प्रकार असल्याचे सांगितले आणि कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या