हिंगोली प्रतिनिधी
धान फौंडेशन व कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या संयुक्त विधेमाने पोषक परसबाग या विषयी ऑनलाईन गुगल मिट व्दारे कार्यशाळा व मार्गदर्शन करण्यात आले . प्रमुख मार्गदर्शन प्रा. माधुरी रेवणवार गृह विज्ञान तज्ञ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांनी सेंद्रिय परसबाग कशी निर्मिती करायची व त्याची आखणी पोषक बाग – गंगामा मंडळ या प्रकारे निर्मिती करावी . त्याची आखणी एकूण व्यास – 30 फुट . आतील गोल -६ फुट , मधले गोल -१८ फुट ,बाहेरील गोल -30 . व त्यात अनुक्रमे मेथी ,पालक ,गाजर ,मुळा ,कांदा ,शेपू,कोथिंबीर ,टमाटे .वांगी, मिरची,गोबी , गवार,कारले ,काकडी , इत्यादी प्रकारच्या भाजीपाले आपण लाऊ शकतो .गंगामा मंडलचे चे फायदे या प्रकारच्या मंडल मध्ये जागेचे योग्य नियोजन होते .यात एकूण २३-२४ प्रकारच्या भाज्या लावता येतात ,पाणी देण्याचे योग्य नियोजन करता येते ,तसेच सांड पाण्याचे नियोजन होते ,ज्यास्त प्रकारच्या भाज्या लावल्या मुळे भरपूर पोषक भाजी त्याज्या मिळतात.व माधवी बावडे विभागीय अधिकारी धान फौंडेशन यांनी परसबाग का तयार करावी व त्याचे योग्य नियोजन करून सध्या स्थितीला त्याचा फायदा कसा होईल या विषयी माहिती दिली व अनिल दवणे व व्यवस्थापक लोकसंचालीत साधन केंद्र हिंगोली यांनी पोषक परसबाग निर्मिती केल्यास अपलाला ताजे व विष मुक्त भाजी पालेभाज्या खाण्यास मिळतात आणि आपली रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते असे सांगितले . या ऑनलाईन गुगल मिट कार्यशाळेला कंधार येथील व्यवस्थापक विकास हंडे व जळकोट व्यवस्थापक चेतन मोरे , सागर शिंदे , मयूर ठवली ,हनुमान जगताप , चंद्रशेखर गढेकर, अक्षय पतंगे , भीम तारू , सीमा लोणकर,संगीता जाधव ,प्रियंका इंगळे ,निकिता दिपके व सर्व लोकेशन मधील सहयोगिनी , कलंजीयम सभासद यांनी उपस्थिती दर्शवली होती .

0 टिप्पण्या