अजिंक्य राठोड मो. 8999787532
बस्स एवढे कमी टक्के मिळाले.
हा वाक्य जवळपास 90%विद्यार्थ्यांनि खूप वेळा ऐकलं असेल याची खात्री मला आहे कारण मी सुध्दा एक विद्यार्थीच आहे...आणि हा प्रश्न विचारणारे दुसरे कोणी नव्हे तर आपलेच नातेवाईक असतात हेही तितकंच खरं आहे...आज निकाल लागला की लगेच खूप सारे आपले शुभचिंतक नातेवाईक आपल्या पालकांना कॉल करतात आणि विचारतात की "किती टक्के मिळाले हो आपल्या अजिंक्य ला?"मग अजिंक्य चा पालक थोड्या दबक्या आवाजात म्हणतो "काही नाही हो 35%मिळाले त्याला"आणि इकडं त्या नातेवाईकाच्या मुलाला 55%मिळाले असतात तर तो खुश होऊन म्हणतो.."काय फक्त 35%?अहो आमच्या पोराला 55%मिळाले"...आणि दोन गोष्टी शिकवून फोन ठेवून देतो..म्हणजे साध्य काय करायचं हो तुम्हाला ?आणि तीन तासाच्या पेपरमध्ये टक्केवारी बघून तुम्ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याच भविष्य कसकाय ठरवू शकता हो ?आपल्या मुलांना तुम्ही मनाने कमकुवत बनवत आहात दुसरं काही नाही..अहो भरा न बळ त्याच्या मनात,वाढवा न त्याची इच्छाशक्ती,द्या न त्याला तुमच्या दोन प्रेमळ शब्दांचा आधार..विद्यार्थी टक्केवारी ने कधीच घडत नसतो तो घडतो त्याच्या वारंवार प्रयत्न करण्याने आणि प्रबळ इच्छाशक्तीने..35%वाला मुलगा आयुष्यात अयशस्वी राहील हे तुम्ही सांगू शकता का?नाही ना..कारण चौथी नापास असलेली लोक आज जगातील सर्वोच्च यशस्वी लोकांमध्ये गणले जातात...आकड्यावरून कुणाचं भविष्य ठरत नसतं हो...मला जाणीव आहे की तुम्ही त्याच्या भल्यासाठीच सांगता अस पण अश्या सांगण्यात त्याचा काहीच भलं नाही हेही तितकंच खरं आहे...तुम्ही जरूर तुमच्या पाल्याना रागवा हो पण त्याच्या आकडेवारीवरून नका त्याच्या वागण्यावरून ,त्याच्या सवयीवरून रागवा..मला माहिती आहे की तुम्हाला त्यांचं काही वाईट नाही करायचं पण आपल्या आशा बोलण्याने त्याचा आत्मविश्वास डगमगतो..त्यामुळं नकळतपणे त्यांचं वाईट च होत याची जाण आपल्याला होत नाही..विद्यार्थ्यांना मजबूर नव्हे तर मजबूत बनवा हो तर तो आयुष्याच्या परीक्षेत यशस्वी होईल..शाळा ,कॉलेज च्या परीक्षेत तो नापास झाला किंवा कमी टक्के मिळाले तर तो समोर काहीच करू शकत नाही हे तरी आमच्या मानसिकतेतुन कधी जाईल हो ?दहावी मध्ये इंग्रजी मध्ये नापास झालेल्या सचिन तेंडुलकरवर आज 12वीच्या इंग्रजी पुस्तकात धडा आहे ..आपली पोर कर्तबगार असतात हो त्यांना फक्त गरज असते ती तुमच्या माझ्या प्रेरणेची ,दोन प्रेमाच्या शब्दांची..आपण किती अपेक्षा ठेवतो यापेक्षा आपण आपल्या पोरांचा किती आत्मविश्वास वाढवतो यावर त्यांचं भविष्य अवलंबून असते..जस पास झालेल्या पोरांचं कौतुक करतो तस नापास झालेल्या,कमी टक्के मिळालेल्या पोरांना पण आपण कौतुकास्पदच प्रेरणा दिली पाहिजे ..तर आपली येणारी पिढी स्वावलंबी बनेल ..आत्मनिर्भर भारत नुसतं सरकारनेच बनवावं अस नसत हो ते आपल्या सारख्या सामान्य लोकांच्या असामान्य विचारातूनही बनवता येत....मला वाटत की "आत्मनिर्भर भारत" बनवण्यापेक्षा "आत्मनिर्भर विद्यार्थी"जर आपण घडवले तर नक्कीच भारत एक दिवस आत्मनिर्भर बनेल याची मला खात्री आहे......माझ्या या बोलण्याने कुणाला नकळत काही त्रास झाला असेल तर तुमच्या पेक्षा लहान भाऊ समजून माफ करा..शेवटी माणूस आहे चूका तर होणारच🙏....
धन्यवाद:अजिंक्य राठोड🙂 जिल्हाध्यक्ष कर्तव्यदक्ष फाऊंडेशन यवतमाळ
0 टिप्पण्या