सावळेश्वर येथील डांबरी रस्त्याचे निकृष्ट बांधकाम


प्रतिनिधी: सावळेश्वर (मारोतराव रावते )
जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत सावळेश्वर येथील मुख्यमंत्री दत्तक ग्राम योजनेअंतर्गत गाव ते झोपडपट्टी रस्त्याचे डांबरीकरण काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.
रस्त्याला साईड नाल्या काढल्या नसल्यामुळे सर्व पाणी रस्त्यावरून वाहत आहे.रस्त्यावर पाणी साचत असल्यामुळे पाण्यावर डास, मच्छर झाल्याने गाव परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.परिणामी दहा लाख रुपयाचे काम दोन महिन्यात पाण्यात वाहून गेले आहे.तरी सबंधित विभागाने कामाची चौकशी करावी अशी मागणी गावकरी व्यक्त करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या