गावाकडच्या बातम्या न्युज नेटवर्क
बंदीभाग म्हणून ओळखला जाणाऱ्या दराटी येथे क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण होऊन एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अलका लक्ष्मण झिंगरे वय 22 वर्षे राहणार दराटी आत्महत्या केलेली महिलेचे नाव आहे. काल दिनांक 21 जुलै रोजी सायंकाळी अलका व लक्ष्मण यांच्या मध्ये किरकोळ कारणामुळे वाद झाला. वादामुळे अलका हिने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत दराटी पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास चालू आहे.

0 टिप्पण्या