ढाणकी परिसरात सोयाबीनवर अळींचा हल्ला.


ढाणकी प्रतिनीधी- आधीच आसमानी संकटाशी  सामणा करत असलेल्या बळीराजांच्या नशीबाचे दुख काही केल्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाही आहे. दुबार पेरणीमुळे हतबल झालेल्या शेतक-यांसमोर आता अळी व तांबेरा या रोगाचे नविन संकट दत्त म्हणुन उभे आहे. त्यामुळे ढाणकी परिसरतील शेतकरी हवालदिक झाले असुन याचाशी  सामना कसा करावा या विचारात आहेत.
ढाणकी मध्ये आज कोरोणाचे आठ रूग्ण सापडल्याने सगळीकडे भितीचे वातावरण आहे. कोरोणाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी महासंघाने सहा दिवसाचा कडकडीत बंद घोशीत केला आहे. त्यामुळे शेतक-यांसमोर अजुन एक संकट आहे. सोयाबीनवर पडलेल्या शेंड अळी, कोसमाशी , चक्री भंुगा या अळींवर फवारण्यासाठी लागणारे किटकनाशक कसे खरेदी करायचे हा मोठा प्रष्न आहे. 
सध्या ढाणकी बाजार पेठेत युरीया खताचा सुध्दा मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत असुन शेतक-यांना युरीया मिळवण्याढाणकी परिसरात सोयाबीनवर अळींचा हल्लासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही कृषी  केंद्र चालकांच्या जवळ युरीया असुन सुध्दा ते शेतक-यांना देण्यास टाळाटाळ करत असल्याने युरीया कसा मिळवायचा या चिंतेत शेतकरी राजा आहे. या सर्व बाबतीत मात्र कृषी  विभाग मुग गिळुन चुपचाप बसला असल्याने ढाणकी परिसरात संशयाचे वातावरण असुन तालुका कृषी  अधिका-यांना तातडीने या सर्व बाबींवर उपाययोजना करावी अशी  मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या