ढाणकी प्रतिनिधी
सध्या कोरोनामुळे संपूर्ण राज्यात जमावबंदी तसेच काही भागात संचारबंदी लागू आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अश्याही स्थितीत अवैध उद्दोयाना ऊत आला असून दारू ची तस्करी सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहे.
ढाणकी येथे कोरोनाचे 7 व्यक्ती पॉसिटीव्ह आढळण्याने कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायभाये हे टेंभेश्वर नगर येथे असताना दोन इसम मोटारसायकल वरून भरधाव येताना संशयास्पद आढळले.
सदर व्यक्तींना अडवून चौकशी केली असता गाडी चालवणारा अनिल सदाशिव चटलेवाड वय 23 वर्ष हा गाडी चालवत होता तर मागे बसलेला व्यक्ती राजेश बाबुलाल भंडारे वय 23 वर्ष हा पांढऱ्या पोत्यात काही तरी घेऊन बसलेला आढळला. पोत्याची पाहणी केली असता पोत्यात देशी दारू भिंगरी च्या 90 मिली च्या 120 बॉटल प्रत्येक बॉटल 26 रुपये असा एकूण 3120 रुपये चा माल जप्त करण्यात आला. त्यांच्याकडून मोटारसायकल, जिओ कंपनीचा मोबाईल असा असा सर्व मुद्देमाल एकूण किंमत 19120 रुपये जप्त करण्यात आला असून त्या इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. सदर कारवाई बिटरगाव पोलीस स्टेशनं चे ठाणेदार विजय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामकिसन जायभाये, पोलीस शिपाई मोहसीन खान यांनी केली.

0 टिप्पण्या