बचतीच्या मार्गातून साधली महिलांनी आर्थिक प्रगती. धान फौंडेशनची लाभली त्यांना साथ.


  हिंगोली प्रतिनिधी 
अनेक वर्षा पासून महिलांचे काम फक्त चूल आणि मुल एवढेच होते.  महिलांनी फक्त घर सांभाळायचे आणि पुरुषांनी व्यवहार असे समीकरण समाजात रूढ होते. महिलांना काही कळत नाही त्यांनी फक्त मुलांना सांभाळायचे असे प्रत्येकाला वाटत असे.  मात्र काळ झपाट्याने बदलत गेला आणि आजची स्त्री जन्माला आली.  आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. त्यांच्या या प्रगती मध्ये अनेकांचा वाटा आहे.  स्त्रिया आज क्षिक्षण घेऊन आपली उन्नती साधतं आहेत तर काही महिला आपल्या कला गुणांना वाव देत कुटुंबाचा गाडा हाकत आहेत.  अश्याच महिलांच्या कला गुणांना बाहेर आणून त्यांना बचतीची सवय लावून,  त्यांची   2010 पासून ते आज पर्यंत गेले दहा वर्ष मार्ग दाखवत आहे हिंगोली येथील धान फाउंडेशन ही संस्था. 

        धान फाउंडेशन ची स्थापना तामिळनाडू मधील मदुराई येथे     2 ऑक्टोबर 1997 रोजी महात्मा गांधी यांच्या जन्म दिनी झाली.  आज धान फाउंडेशन देश भरात 14 राज्यां मध्ये आपली सेवा देत असून महिलांच्या उन्नती साठी झटत आहे.  हिंगोली तालुक्यातील गरीब महिला चे  कलंजीयम बचत गट  स्थापन करण्यात आले . सुरवातीला महिलांना बचतीचे महत्व सांगून महिलांना  बँकेचे आर्थिक  व्यवहार ( देवान –घेवाण ) कसे करायचे याचे  प्रशिक्षण देण्यात आले. नंतर दोन तीन महिन्यांनी गटातील अध्यक्ष व सचिव यांची बँकेचे व्यवहार करण्यास सुरवात केली ,नंतर गटातील सर्वच महिला मासिक बैठक संपल्या नंतर बँकेचे व्यवहार करून कार्यालयात जमा खर्च  देऊ लागल्या .
आकाशझेप लोकसंचालीत साधन केंद्र *हिंगोली तालुक्यातील ४३ गावामधील २१९ गटामध्ये २४८५ गरीब कुटुंबासोबत महिला* सक्षमीकरण आणि गरिबी निर्मुलन करण्याचे  कार्य चालू आहे . कलंजीयम गटांच्या माध्यमातून महिलांना मासिक बचत, अंतर्गत कर्ज, राष्ट्रीय कृत बँकेचे कर्ज ,विमा , विविध सरकारी योजना , RSETI , जिल्हा उधोग केद्र मार्फत महिलांना लघु  उद्योगा विषयी मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचे कार्य चालू आहे. तसेच महिलांना स्वबळावर रोजगार मिळण्याकरिता मानव विकास योजने मार्फत महिलांना बोकड पालन , कृषी अवजार बँक , पॉलि हाउस, धान्य सफाई यंत्र , उपलब्ध करून देण्यात आले . कृषी विभाग मार्फत मिनी दालमिल , २ गटांना उपलब्द करून दिली . गाव पातळीवर महिलांनी लहान लाघु उद्योग जसे किराणा दुकान , हळद + मसाले , आणि पिठाची गिरणी , शेळी पालन , कुकुट पालन , कापड दुकान , शिलाई मशीन , बांगडी इत्यादी व्यवसाय करुन महिला सक्षमीकरना कडे वाटचाल चालू आहे .
महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या ग्रामविकासाच्या महत्वाला जाणून त्यांच्या जन्मदिनी स्थापन झालेल्या धान फाउंडेशन आज देशात नाव करत असून ग्रामीण महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करत आहे.  धान फाउंडेशन मुळे आज कित्तेक संसार उभे राहिले व आर्थिक सक्षम झाले आहेत.  आणि या सर्व धडपडी मध्ये निच्छितच फाउंडेशन च्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा मोठा हात आहे हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. 



*प्रतिक्रिया*

आम्ही विविध सरकारी योजनेच्या  माध्यमातून  महिलांना लघु उद्योग याच्याविषयी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयं रोजगार कसा उपलब्द करता येईल याच्यावर भर देत आहे , व तालुक्यातील  सिंडीकेट बँक , बँक ऑफ महाराष्ट्र व यांच्या सहकार्याने आम्ही महिलांना लाघु उद्योग करिता कर्ज उपलब्द करून देत आहे. त्यातून त्यांना नक्कीच फायदा होईल आणि त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील असा आम्हाला विश्वास आहे. 

 अनिल दवणे 
व्यवस्थापक 
आकाशझेप लोकसंचालीत साधन केंद्र हिंगोली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या