माणिकमोती कंपनीचे बियाणे निघाले बोगस. निंगनूर येथील शेतकऱ्याची फसवणूक.


(आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना बसला फटका)

निंगनूर प्रतिनिधी -मारोती गव्हाळे
उमरखेड तालुका अंतर्गत येत असलेल्या निंगणुर नागेशवाडी येथील शेतकरी गणेश मारोती राठोड हा असून, त्यांनी गौरीशंकर ऍग्रो एजन्सी फुलसावंगी यांच्याकडून महासागर भुईमूग (शेंगदाणा) २ बॅगा घेतल्या होत्या,व  ते दोन्ही बॅग माणिकमोती कंपनीच्या होत्या. त्यामध्ये त्या बॅगा २० किलोच्या होत्या. ते बॅग आणून त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये पेरले होत्या. त्या भुईमुगाच्या झाडाला नेहमीप्रमाणे तो, खतपाणी घालून त्या पिकाची जोपासना तो शेतकरी फार चांगल्या प्रमाणात नेहमी प्रमाणे करीत होता. वेळोवेळी खतांचा डोस, वेळोवेळी फवारणी हा शेतकरी करीत होता. हा सर्व खर्च त्या शेतकऱ्यांनी त्या पिकावर केला असून, त्या भुईमुगाच्या झाडाला शेंगाच लागल्या नाहीत. सदर  ते बियाणे बोगस निघाले असून, गौरीशंकर ऍग्रो एजन्सी फुलसावंगी .यांनी बोगस बियाणे देऊन सदर शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.या आधी सुद्धा याच विक्रेत्या विरुद्ध दराटी येथील शेतकऱ्यांनी बोगस बियाणं विकली म्हणून तक्रार दिली होती.  तरी सदर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून. त्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे .असे या शेतकऱ्याने स्पष्ट सांगितले आहे. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यातील निंगणूर  हे गाव आत्महत्या च्या बाबतीत एक नंबर वर असून,ऐन दिवाळी व पंचमी सारख्या सणासुदीच्या मुहूर्तावर सुद्धा, येथे आत्महत्या झालेल्या आहेत .त्यामध्येच हा गणेश मारोती राठोड हा  आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्य आहे. त्यांच्या वडिलांनी सुद्धा सततच्या नापिकीला कंटाळून, कधी ओला दुष्काळ तर, कधी कोरडा दुष्काळ. यामध्ये कर्जाचे सावट या विवंचनेत त्यांच्या वडिलांनी ही आत्महत्या केली होती. वडील गेल्यापासून ही जबाबदारी गणेश मारोती  राठोड यांच्यावर आली . त्यांनी मोठ्या आशेने पर्हाटि (कापूस) उपटून भुईमूग पेरला. पण बोगस बियाण्यांमुळे त्यांच्यावर आणखी फार मोठे संकट ओढावले गेले. त्यात त्यांची फार मोठी फसवणूक झाली. त्या फसवणूक करणाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करून, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. व त्यांच्या शेतातील झालेल्या नुकसानीची पाहणी करून, त्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी .करिता सदर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांना तक्रार अर्ज दिला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या