रमजान महिना व ईद होईपर्यंत ढाणकी शहरातील दुकाने बंद ठेवावी




मुस्लीम समाज बांधवांतर्फे तहसीलदार साहेब, ढाणकी नगरपंचायत, बिटरगाव पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले. 
 (कार्यकारी संपादक गोपाल गौरवाड )

यवतमाळ जिल्ह्यातील covid 19  प्रदुभाव दिवसे दिवस वाढत असुन आपल्या महाराष्ट्र राज्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.  त्या अनुषंगाने  रमजान ईदसाठी आपण ढाणकी मध्ये खरेदीसाठी कापड रेडीमेड अथवा चप्पल व इतर दुकाने  उघडण्याची परवानगी जर दिली तर बाजारपेठेत  गर्दी वाढणार आणि सोशल डिस्टन्स चा महत्त्व रहाणार नाही तसेच  एखादा रुग्ण गर्दीमध्ये फिरला तर स्थिती बिगडण्यास वेळ लागणार नाही. केंद्र सरकार व राज्य सरकार या संकटातुन जनतेला वाचविण्यासाठी आहो रात्र दिवस प्रयत्न करित आहे. यवतमाळ जिल्हा रेड झोन मध्ये आहे मार्केट सुरू झाल्यास रुग्ण संख्या वाढण्यासाठी कारण बनतील याला थांबविण्यासाठी आपले प्रशासन दिवस रात्र काम करित आहे तरी आपण सर्व बाबींवर बिकट परिस्थिती पाहता रमजान महिना अथवा ईदसाठी मार्केट उघडण्याची कोणत्याही स्थितीत परवानगी देवू नये असे समस्त ढाणकी व टेंभेश्वरनगर मुस्लीम बांधवांनी ढाणकी येथील मुस्लीम बांधवा तर्फे रमजान ईद होईपर्यंत दुकाने बंद ठेवण्यासाठी उमरखेड येथील तहसीलदार साहेब, ढाणकी नगरपंचायत, बिटरगाव पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले. या वेळी उपस्थित हाजी शेख जहीर शेख मोला जमींनदार,शे.जब्बार शेख महेमुद,सै.खालेद सै.जिलानी,शेख शाहरूख शेख आकील,शेख तयब शेख अमद,शेख कदीर शेख बाबु यांनी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या