नगरपंचायत मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष.
ढाणकी प्रतिनिधी
सध्या जगावर आलेल्या संकटावर मात करण्याकरिता यवतमाळ जिल्हा संचार बंदीमुळे व कोरोना रुग्ण संख्येमुळे भयभीत असताना ढाणकी शहरात संचार बंदी चे नियम धाब्यावर बसल्याणे सकाळी 3 ते 5 या वेळेत शहरातील बरेच दुकाने चालू असल्याचे मॉर्निंग वॉकला जाणारे सुशिक्षित नागरिक सांगत आहे
यवतमाळ जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत नियमावली बनवून नगरपरिषद ,नगरपंचायत, ग्रामपंचायत यांना काही अधिकार दिले आहेत त्यानुसार ढाणकी हे शहर नगरपंचायत क्षेत्रात आहे
त्यानुसार नगरपंचायत चे कर्मचारी सकाळी 10 ते 12 या वेळेत सोशल डिस्टन्स सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, (मास) तोंडाला कपडे न बांधणे व अत्यावश्यक सेवेत नसलेले दुकाने चालू असल्यास त्यांच्याकडून दंड आकारण्यात नगरपंचायत पुढे आली आहे
अत्यावश्यक सेवेत नसलेली व्यापारी सकाळी ४ वाजता आपले दुकाने चालू करून ग्राहकांना मोबाईल द्वारे बोलावून सर्रासपणे दुकाने चालू करून संचार बंदी चे नियम धुडकावून कापड, सिमेंट ,स्टील, भांडी , इलेक्ट्रॉनिक्स दुकान व इतर सर्व प्रकारचे दुकान चालू ठेवून शासनाचे नियम मोडत आहेत. ज्या दुकानदाराचे दुकानें बंद आहेत त्या दुकानदारांनी "आम्ही पण दुकानें चालू ठेवावे का? " असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे.
प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दुकाने चालू करणाऱ्या दुकानदारावर प्रशासन सकाळच्या वेळी जाऊन कारवाई करू शकते का ? याकडे परिसरातील जनतेचे लक्ष वेधले आहे

0 टिप्पण्या