अंगणवाडी क्रमांक 9 मध्ये पोषण आहार वाटप.



ढाणकी प्रतिनिधी 
ढाणकी येथील अंगणवाडी क्रमांक 9 मध्ये बालकांना पोषण आहाराचे आज वाटप करण्यात आले. 
सध्या च्या लोकडाऊन च्या स्थिती मध्ये सर्व व्यवहार बंद असून मजुरदार वर्गा चे एका वेळेस च्या खाण्याचे हाल होत आहे.  अश्या स्थिती मध्ये लहान बालकांचे सुद्धा हाल होत असून त्यांना सकस आहार मिळत नव्हता.  त्यामुळे शासनाने सर्व लहान बालकांसाठी पोषण आहार वाटण्याचे आदेश सर्व अंगणवाडी सेविकांना दिले. ढाणकी येथील अंगणवाडी क्रमांक 9 च्या सेविका सौं उषा पुंडे यांनी सकाळीच बालकांच्या पालकांना बोलावून नगरसेवकांच्या उपस्थिती मध्ये पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. 
यावेळी ढाणकी शहरातील ढाणकी नागरपंचायतचे उपाध्यक्ष जहीर भाई,  बालकल्याण सभापती ज्योती ओमाराव चंद्रे,  सभापती बसनूरबी सय्यद खालील,  सभापती सोनम नितिनसिंग बैस,  सभापती संबोधी गायकवाड,  नगरसेवक चंपत  मिटकरे  सर्व नगरसेवक, व गावातील प्रतिष्टीत व्यक्ती  उपस्थित होते.  सर्व लहान बालकांच्या पालकांना सामाजिक अंतरामध्ये उभे करण्यात आले होते.  व सर्वच्या तोंडाला मास्क सुद्धा होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या