बिटरगाव बु. प्रतिनीधी-,कमलाकर दुलेवाड
कोरोनाचे संकट पुर्ण देशावर असल्याकारणाने देशात लॉक डाऊन पाळण्यात येत आहे. खरिप हंगाम व पावसाळा जवळ आला असताना शेतीच्या कामांना वेग आला आहे. तसेच देशत असलेल्या लॉक डाऊन चा फटका शेतक-यांना बसू नये तसेच बियाणे व खते खरेदी करताना तालुका स्तरावर शेतका-यांनी जास्त प्रमाणावर गर्दी करु नये या करिता मा. कृषि मंत्री यांच्या सुचनेनुसार शेताका-यांच्या बंधावर बियाणे व खते पोहाचवण्याची तयारी कृषि विभागाच्या मार्फत तालुका कृषि अधिकारी उमरखेड केली आहे. उमरखेड तलूक्यातीलशेतक-यांना बियाणे व खते थेट त्यांच्या बांधावर पोहचाविण्यासाठी तालुका कृषि अधिकारी उमरखेड च्या वतीने एक ऑनलाईन लिंक (https://forms.gle/wJXeRMNbvaVr5FYx7) प्रसिद्ध करण्यात आली असून या लिंक वर क्लिक करुन शेतका-यांनी अवश्यक बियाणे व खते यांची आपल्या पसंतीच्या कृषि केंद्रसाठी नोंदणी करावी असे अवाहन श्री. समधान धुळधुळे तालुका कृषि अधिकारी उमरखेड यांनी उमरखेड मधिल सर्व शेतका-यांना केले आहे.
अचुक व योग्य माहिती भरण्यासाठी उपलब्ध पिकांचे वाण, खतांचे उत्पादक कंपणी व कृषि केंद्रांची नावे सदर लिंक वर उपलब्ध करुन दिली आहेत. नोंदणी केल्यानंतर आपल्या गावतील एकसमान वस्तुंची मागणी असणा-या व एकाच कृषि केंद्रातुन खरेदी करण्यास ईच्छुक शेतका-यांचा एक तात्पुरता गट तयार कराण्यात यईल व सहकार्याने एक गट प्रमुख निवडुन त्याच्या व गावतील कृषिमित्र व कृषि सहाय्यकाच्या मदतीने पुढील कार्यवाही करण्यात यईल. आपल्या मागणीनुसार आपण निवड केलेल्या कृषि सेवा केंद्र मार्फत आपल्याला संपर्क करुन गावतील शेतकायांचे खते व बियाणे गावात पोहचवण्याची व्यवस्था करण्यात येईल. सदर खताची व बियाण्यांची रक्कम आपण कृषि सेवा केंद्राकडे विचारणा करुन ऑनलाईन किंवा नगदी स्वरुपात भरु शकतो. बियाणे व खते यांच्या योग्य व गुणवत्तापूर्वक निविष्ठा आपल्या पर्यंत पोहचतील याबाबत कृषि विभाग नियंत्रण ठेवणार आहे.
आपल्या गावात बियाणे प्राप्त झल्यानंतर उगवण क्षमता तपसावी व बियाणाला बुरशीनाशक, किटकनाशक व जिवणुची बिजप्रकिया करावी व योग्य मशगत करुन समधानकारक पाऊस झाल्यावर अन जमिनीत पुरेशप्रमाणात ओलावा झाल्यावरच पेरणी करावी.
उपरोक्त प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास लिंक मध्ये सर्व आपल्या गावाच्या संबधित मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांचे मोबाईल क्रमांक दिले असुन त्याच्यांशी संपर्क करावा व सध्याच्या कोरोनाच्या आपत्कालीन परास्थितिमध्ये गावातच थांबुन प्रशासनास सहकार्य करावे व खरिप हंगामची योग्य तयारी करावी असे कृषि विभाग उमरखेड यांनी तालुक्यातील शेतका-यांना अवाहन केले आहे. -------------

0 टिप्पण्या