माहूर:-
माहूर तालुक्यातील मालवाडा येथे मागील दोन दिवसापूर्वी धानोरा तालुका उमरखेड येथील 64 वर्षीय कोरोना बधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या जावाई व मुलगी सह लखमापूर येथील एक अशा तिघांचे अहवाल आज निगेटिव्ह आल्याने माहूर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून सदर बाधित रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला अधिक उपचारा साठी नांदेड येथे हलविण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. एन. भोसले यांनी दिली आहे.
तालुक्यातील मालवाडा येथे आपल्या मुली जावई कडे आलेल्या 64 वर्षीय धानोरा जिल्हा यवतमाळ येथील नागरिक कोविड केअर सेंटर मध्ये दाखल होता. त्याचे शुक्रवारी स्वॅप तपासणी साठी पाठविले होते.त्याचा अहवाल दिनांक नऊ रोजी पॉझिटिव्ह आले होते त्यानंतर माहूर व उमरखेड तालुक्यात एकच खळबळ माजली होती उमरखेड तालुक्यातील धानोरा व माहूर तालुक्यातील माळवाडा हे गाव प्रशासनाने सील केले असून त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. बधिताचा संपर्कातील अन्य एकालाही आज आरोग्य विभागाने ताब्यात घेऊन त्याचे स्वॅप तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. एन. भोसले यांनी दिली आहे.

0 टिप्पण्या