लोक वर्गणीतून केली कोरंटाईन व्यक्तींची जेवण, नाश्त्याची व्यवस्था. नगराध्यक्षांचा पुढाकार.





ढाणकी प्रतिनिधी
कोरोना ने संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे.  कोरोनाचा सर्वात जास्त फटका हा मजुरदार वर्गाला बसला असून त्यांचे एका वेळच्या जेवणाची सोय नाही आहे.
लोकडाऊन काळात पुणे,  मुंबई वरून ढाणकी मध्ये आलेल्या व कोरंटाईन केलेल्या कुटुंबाचा दोन वेळच्या जेवण व नाश्त्याची  व्यवस्था  ढाणकी येथे लोकसहभागातुन करत असून गावातील  दानशूर व्यक्ती,  नगरसेवक यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
कोरंटाईन केलेल्या लोकांची सोय ही स्थानिक नगर पंचायत ने करायला हवी,  मात्र नगरपंचायत कडे कोणताही फंड उपस्थित नसल्या कारणाने आता या कोरंटाईन केलेल्या नागरिकांची काय व्यवस्था करायची?  हा गावापुढे मोठा प्रश्न पडला होता.  तेव्हा नगरअध्यक्ष सुरेश जयस्वाल,  विष्णुदास वर्मा,   प्रतिष्टीत नागरिकांनी पुढाकार घेत ही समस्या सोडवली. आपल्या स्वतःच्या खिशातील पैसे व लोकवर्गणी गोळा करत   आपणही समाजाचे काही देण लागतो या भावनेतून पुढाकार घेऊन नाश्ता व जेवणाची व्यवस्था केली. या कार्यात शहरातील इतर नागरिक सुद्धा आपापल्या परीने सहभाग देत असून पक्ष पक्षाचे राजकारण न करता फक्त समाजसेवा ह्या उद्देशाने हे कार्य चालू आहे. 

नगराध्यक्ष यांच्या या उपक्रमाचे  ढाणकी मध्ये कौतुक होत आहे.
या उपक्रमात प्रत्येक व्यक्ती आपला सहभाग देत असून अध्यक्ष सुरेशलाल जयस्वाल,  उपनगरअध्यक्ष शेख जहीर शेख मौला , विष्णुदास वर्मा,  सर्व नगरसेवक,  गावातील नागरिक यासाठी परिश्रम घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या