सदर परवाना धारकांवर काय कार्यवाही होईल?याकडे लक्ष लागले आहे.
निंगनूर प्रतिनिधी -मारोती गव्हाळे
उमरखेड तालुका अंतर्गत येणाऱ्या निंगणूर या गावची एम आर पंडागळे, स्वस्त भाव दुकानदार यांची तक्रार जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ. यांच्याकडे पोर्टल द्वारे तक्रार केली . व मेलद्वारे ही तक्रार पाठवली. व या अगोदरही तहसीलदार साहेब उमरखेड यांना वैयक्तिक तक्रार म्हणून उत्तम शेळके यांनी तक्रार केली होती. त्याच अनुषंगाने स्वस्त भाव धान्य दुकानदारांनी मोफत चे तांदूळ बरोबर वाटप केले नसून ,त्या लाभार्थ्यांचा जो मला भेटायचा तो माल त्यांना मिळाला नाही. त्यांचा माल सदर परवानाधारकांनी हडप केला आहे. हीच तक्रार तहसीलदार साहेब यांच्याकडे दिली असता, त्यांनी त्या सदर स्वस्त धान्य दुकानदार यांच्या स्वस्त धान्य दुकानाची पाहणी करण्याकरिता पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री.राहुललोड यांना पाठविले.ते राहुललोड साहेब चौकशी करण्याकरिता आले होते. सदर स्वस्त धान्य दुकानाची चौकशी केली. चौकशीअंती विचारपूस केली असता, स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे तक्रार रजिस्टर नव्हते. व बीपीएल व अंत्योदय धारकांच्या याद्या सुद्धा नव्हत्या. पुरवठा निरीक्षण अधिकारी राहुललोड यांनी संबंधित तक्रार कर्ते यांचे बयाण नोंदविले असून, त्यांना सुद्धा सदर स्वस्त धान्य दुकानदार यांनी किती बोगस काम केले हे लक्षात आलेच असेल? पण सांगता येत नाही. सदर पुरवठा निरीक्षण अधिकारी साहेब यांनी संबंधित तक्रारकर्ते यांचे बयान लेखी स्वरुपात लिहून घेतले. व सदर प्रकरणाचा अहवाल बनवूनच तहसीलदार साहेब यांच्याकडे पाठवतो .असेही स्पष्ट शब्दात सांगितले. व संबंधित स्वस्थ धान्य दुकानदार यांच्यावर लगेचच योग्य ती कार्यवाही करण्यात येईल हेही सांगितले. त्यामुळे निंगणूर येथील तक्रारकर्त्याना अपेक्षा लागली की? त्यावर काय कार्यवाही होईल? त्यांचा परवाना रद्द होईल किंवा नाही? याकडे तक्रारकर्त्याचे व समस्त निंगणूर गावातील जनतेचे लक्ष वेधले आहे. तहसीलदार साहेब यांच्या वर काय कार्यवाही करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या