सावळेश्वर येथे वारा,वादळ आणि आवकाळी पाऊस.


प्रतिनिधी - अनिल राठोड ढाणकी

उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर येथे अवकाळी पाऊस झाला असून 
गावातील घरांचे, झोपडपट्टी येथील घरांचे,जिल्हा परिषद शाळा व आनंदीबाई माध्यमिक विद्यालय झोपडपट्टी. व शेतातील फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

वादळी व अवकाळी पाऊस असल्यामुळे आपल्या सावळेश्वरवर एक  परिघातच  पडला आहे. त्यामुळे शासन व प्रशासनास आपल्या उध्वस्त घरांची दाहकता व दखल घेण्यास  बरेच  प्रयत्न करीत आहेत.घरातील गहू,तांदूळ, ज्वारी व इतर अन्नधान्य भिजून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.घरावरील छप्पर, टीन पत्रे उडाली आहेत.शाळेमध्ये मध्ये बाहेर गावावरून आलेल्या  लोकांना क्वारंटाईन  केलेल्या शाळेवरील पत्रे सुद्धा उडाली आहेत. म्हणजेच सावळेश्वर येथील जनजीवन विस्कळित झाले आहेत. आवकळी पाऊसाने फार मोठ्या प्रमाणात शेतकरी व मजुरदार वर्गाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.फार मोठ्या प्रमाणात जीवितहानी नाही.पण वित्त हानी झालेली निदर्शनास आली आहे.सदर गावामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले असून बऱ्याच प्रमाणात तेथील गावकऱ्यांचे नुकसान झाले आहे.सदर नुकसानीची पाहणी करून  शासनाने त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्था मार्फत होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या