ढाणकी प्रतिनिधी
कोरोना या वैश्विक महामारीच्या आजाराने सर्वत्र थैमान घातले असताना समाजातील अनेक संवेदनशील संघटनांनी पुढे येत शासनाला मदत केली आहे .आपले सरकार सेवा केंद्र व सीएससी चालक उमरखेड तालुका संघटनेने 200 किराणा किट दिल्या आहेत.यवतमाळचे जिल्हाधिकारी यांनी आपले सरकार केंद्र चालक ,सी एस एसी केंद्र चालकांना मदतीचे आवाहन केले होते .हे केंद्र चालक सध्या आर्थिक अडचणीत आहेत मागील दीड महिन्यापासून यांचे उत्पन्न बंद आहे .आणि व्यवसाय सुरू असताना सुद्धा म्हणावे तसे नाहीत त्यामुळे आर्थिक चणचण असूनही आपल्या पेक्षा जास्त बिकट परिस्थितीत जगणाऱ्या आपल्या भावंडाना मदतीची अधिक गरज असल्याचे बघून या संघटनेने आपल्या व्हाट्सएपच्या गृपवर मदतीचे आवाहन केले त्यानुसार संवेदनशील आणि समाज ऋणाची जाण बाळगणाऱ्या अनेक व्ही एल ई बांधवांनी अवघ्या दोन तासात 200 किराणा किट्स उपलब्ध होतील एवढा निधी जमा केला .
मानवतेच्या भावनेतून शासन ,प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना आपलाही हातभार असावा या विचाराने अनेक व्ही एल ई बांधवांनी मदत केली.खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही संतांची शिकवन सार्थ ठरवत आपण राहतो त्या समाजाला सहकार्याची ,मदतीची गरज असते त्यावेळी आपण मदत केलीच पाहिजे अशी भावना यावेळी उमरखेड तालुका आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी व्यक्त केल्या.


0 टिप्पण्या