थेट दिल्ली येथुन जिव्हाळा संस्थेस मदतीचा हात . गुंज व जिव्हाळा संस्थे तर्फे जीवनावश्यक वस्तूचा वाटप


ढाणकी न्युज नेटवर्क (गोपाल गौरवाड )  :- कोरोना कोविड-19 या जीवघेण्या महामारी मुळे शासनाच्या व प्रशासनाच्या आदेशानुसार मागील दोन महिण्यापासून संचारबंदी चे काटेकोर पणे पालन केले जात आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुंज संस्था, दिल्ली व जिव्हाळा संस्था, उमरखेड यवतमाळ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विधमाने २२  मे  २०२०  ला मुळावा येथे हातावर पोट असणाऱ्या अतिशय गरीब गरजू विधवा, दिव्यांग, कुटुंबाला संस्थे च्या वतीने संपूर्ण किराणा कीट उमरखेड चे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांच्या हस्ते Rahat Covid 19 या उपक्रमा अंतर्गत वाटप करण्यात आल्या त्या कीट मध्ये गहू 10  कि., तांदूळ 5 कि., तुरडाळ 2 कि, खाद्य तेल 1, मीठ 1 किलो, मिरची पावडर 250 ग्रा., हाळद 100 ग्रा. हातधुण्यासाठी साबण 1 असे या कीट मधील साहित्य आहे  या साहित्य रुपी मदतीचा हात देण्यात आली  त्या वेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी जमलेल्या सर्वाना मार्गदर्शन करताना सांगितले कि प्रथम गुंज संस्था दिल्ली यांचे मनपूर्वक आभार मानले व अजून आमच्या उमरखेड विभागाला शेतकरी बांधवाना व गरजवंता ना मदतीची  नितांत गरज आहे अशा विदारक परिस्थिती मध्ये मदत करावी अशी त्यांनी मागणी व जिव्हाळा संस्था मागील दोन महिन्यापासून  कोरोना  पार्श्वभूमीवर सतत अविरत करत कुठलाही प्रचार व प्रसार न करता कार्य करीत असल्यामुळे जिव्हाळा संस्थे चे आता पर्यंत 300 पेक्षा जास्त किराणा कीट चे वाटप केल्या व सेवा कार्य व जनजागृती कार्य अविरत चालू आहे त्या बद्दल संस्थे चे तोंड भरून कौतुक व अभिनंदन केले तसेच संस्थे च्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
त्या नंतर जिव्हाळा संस्थे चे अध्यक्ष अतुल मादावार हे म्हणाले कि आज थेट दिल्ली येथून आपल्या संस्थेस गरजवंतासाठी किराणा कीट ची मदत केली या सर्व कीट मुळावा, पिंपळदरी, आडद, पोफळी, कळमुला, आमनपूर, खोकलेवाडी या सर्व गावी  हातावर पोट असणाऱ्या अतिशय गरीब गरजू विधवा, दिव्यांग, कुटुंबाला देण्यात येणार आहेत असे ते म्हणाले. या वेळी संस्थे चे सलागर सदस्य रामराव मादावार, ग्रामविकास अधिकारी पंडितकर, तलाठी पैठनकर, पो. पा. शंकर बरडे, संस्थे चे समन्वयक कन्हैया काटकड़े,  शुभदा पाध्ये, शंकर जोगदंड, विजय बेद्रे. व इतर सर्व स्वयंसेवक  हे उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या