आगीत भस्मसात झालेल्या घराच्या कुटुंबाला जिव्हाळा स्वंस्थेची मदत.


(पीडित कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूची मदत) 

ढाणकी (गोपाल गौरवाड ):-  सध्या संपूर्ण जगात कोरोना  या आजाराने थैमान घातले असून, सर्व देश लॉकडाऊन मध्ये आहे. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या  निंगणूर या गावातील गरीब आदिवासी कुटुंबाला  जिव्हाळा  संस्था एक वरदान ठरली आहे. येथील आदिवासी कुटुंबाचे सुरेश खरवडे व रंजनाबाई खरवडे  यांचे संपूर्ण घर जळून भस्मसात झाले असून ,त्यांचा संसार उघड्यावर अक्षरशः उघडल्यावर आलेला आहे. या पीडित कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याची फार मोठ्या प्रमाणात वित्त हानी  झाली.  असून जीवित हानी थोडक्यात  टळली आहे.  त्यामध्येच त्या झालेल्या पीडित कुटुंबाची नुकसानीची माहिती कानी पडतातच  जिव्हाळा संस्था अवतरली आहे .जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष अतुल मादावार  यांनी एक हात मदतीचा या पार्श्वभूमीवर, सदर कुटुंबियांना एक महिना पुरेल एवढे जीवनावश्यक साहित्य राशन व किराणामाल देऊन कौतुकास्पद कार्य केले आहे. ते कार्य केल्याने संपूर्ण गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भरपाई जास्तीत जास्त कशी होईल ही पावले उचलले आहेत. त्यावेळी जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष अतुल मादावार , सदस्य गजानन नावडे, जिव्हाळा संस्थे चे सल्लागार सदस्य कृष्णा वासमवार,स्वंयसेवक विजय बेद्रे ग्रामपंचायत चे सरपंच बालाजी महाले ,उपसरपंच अंकुश राठोड, ग्रामपंचायत सदस्य रंगराव वायकुळे , प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष अनिल राठोड,
बिरसा ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष मारोती गव्हाळे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मुरगुलवार  व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या