ढाणकी येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ.गोविंद जाधव यांना निलंबित करा. मनसेची मागणी.


ढाणकी प्रतिनीधी-
ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ गोविंद जाधव हे वैद्यकीय सेवा देत असताना एका विषिश्ट समाजाला धारेवर धरत घोर अपमान करून त्यांच्या धार्मिक भावणा दुखावतात. त्यांच्या या वक्तव्यामुळे समाजा समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देषाने सातत्याने अपमानीत करण्यात कृत्य करतात. डाॅ.गोविंद जाधव यांना तत्काळ निलंबित करा अशी लेखी तक्रार जिल्हा वैद्यकीय अधिकारी यवतमाळ यांच्या कडे मनसे उमरखेड तालुका अध्यक्ष शेख सादीक शेख रषिद यांनी केली आहे. निवेदन देते वेळी मनेसे जिल्हाअध्यक्ष देवा शिवरामवार, मनविसे जिल्हाअध्यक्ष अनिल हमदापुरे, निसार पठाण, हे हजर होते.
आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरचे  अनेक प्रताप ढाणकी करांनी अनुभवले व त्यावर पडदे सुध्दा पडले. दिनांक 27 मे रोजी मनसे तालुका अध्यक्ष आपल्या नातेवाईकांना फिटनेस प्रमाणपत्र मिळण्याकरीता दवाखान्यामध्ये गेले असता डाॅ गोविंद जाधव यांनी नेहमी गरीब कुटूंबाच्या मदतीला धावुन जात आपली समाजीक बांधीलकी जोपासणा-या शेख सादीक शेख रषिद यांना डाॅक्टरच्या बोलण्याचा अनुभव आला. 
सरकारी दवाखाना म्हणजे गोरगरीबांची जननी आहे. मात्र बेजबाबदार व कर्तव्यशुन्य अधिका-यामुळे ढाणकी करांना मोठया आरोग्य समस्याचा सामना करावा लागत होता. तरी पण ढाणकी कर आज पर्यत त्यांच्या या विशीष्ट  वागण्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या कडुन होणा-या वक्तव्यावर पडदेच टाकत होते. ढाणकी तील अनेक सामाजिक संघटना या प्रकारामुळे पेटुन उठल्या आहेत. मनसेच्या माध्यमातुन डाॅक्टर हटाव या आंदोलनाला वाट फुटली असुन डाॅ गोविंद जाधव यांना निलंबीत केल्या षिवाय स्वस्थ बसणार नाही असे परखड मत मनसे तालुका अध्यक्ष षेख सादीक शेख रशिद यांच्या लेखी तक्रारीवरून दिसते. डाॅ गोविंद जाधव यांच्या जिल्हा वैद्यकीय अधिकारी काय कारवाई करतात? या कडे ढाणकी व परिसरातील नागरीकांचे लक्ष लागुण आहे.


एका विषिश्ठ समाजाला लक्ष्य करत, तसेच सरकारी दवाखान्यात तपासणीस येणा-या रूग्णांना अरेरावीची भाशा वापरत त्यांना अपमानीत करून त्यांच्यावर उपचार करण्याचे आव आनना-या डाॅ गोविंद जाधव यांना निलंबीत न केल्यास जिल्हा मनसेच्या वतीने मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल. होणा-या परिणामाला संबधित विभाग जबाबदार राहील.
-मनसे जिल्हाध्यक्ष
देवा शीवरामवार,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या