*अखेर विकास कामाला ढाणकीत सुरवात, गावातील बंद कुपननलीका, विहीरी दुरूस्तीला, नाली सफाईला प्राधान्य


ढाणकी प्रतिनीधी-
नुकत्याच नगरपंचात झालेल्या ढाणकी येथे नवविर्वाचीत सभापतींनी आपल्या कामाला सुरवात करत गावा मध्ये अनेक वर्षा पासुन प्रलंबित कामाला हात घालत विकास कामे सुरू केली आहे. नवनिर्वाचीत पाणीपुरवठा सभापती संबोधी गायकवाड यांनी आपल्या प्रभागात जावुन नागरीकांच्या समस्या जानुन घेत प्रभागातील बंद झालेल्या नालीतील गाळ काढुन तीला मोकळे केले त्याप्रमाणे शहरामध्ये कोणकोणत्या कुपननलीका बंद आहेत त्याचा आढावा घेत दुरूस्तीचे कार्य सुरू केले. 
ढाणकीची पाणी समस्या ही सर्व जिल्हाला ज्ञात आहे. ढाणकीतील चांभार पेठेतील कुपननलीका मागील काही वर्षा पासुन बंद होती. या बाबीला गांभीर्याने घेत सभापती ने कर्मचा-यांना हाता खाली घेत कुपनलीका दुरूस्त केली. तीला खुप दिवसाने पाणी आलेले पाहुन नागरीकांने समाधान व्यक्त केले. यावेळेस सभापती ज्योतीताई ओमाराव चंद्रे, जॉन्टी विनकरे, नगरसेवक शेख मिरांजी यांनी विशेष सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. अशीच चांगली कामे गावाचा विकास करण्यासाठी होत रहावी हिच सर्व नगरपंचायत नगरसेवक यांच्या कडुन आपेक्षा .. 🙏🙏

    उत्तर द्याहटवा