￰निराधार स्त्री ला साडीचोळी देऊन साजरी केली दिवाळी .

ढाणकी -शेकडो रुपयाचे फटाके फोडून आपण दिवाळी साजरी करतो .मात्र जे गरीब आहेत, निराधार आहेत असे लोक कशी दिवाळी साजरी करत असतील याचा आपण कधीही विचार करत नाही . मात्र समाजात आजही असे लोक आहेत जे दुसर्यांना देण्यातच खरं सुख मानतात .याचे च उदाहरण द्यायचे झाल्यास ढाणकी येथील किशोर भंडारी यांनी गावातील निराधार गरीब महिला लक्ष्मीबाई पडघणे हिला साडीचोळी व फराळाचे साहित्य देऊन दिवाळीचा सन साजरा केला .साडी चोळी स्वीकारताना महिलेच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले होते . किशोर भंडारीच्यारूपात आपला मयत झालेला मुलगा आपल्याला हे आपल्याला देत आहे असे तिला वाटत होते .
          घरी अठरा विश्व दारिद्र , घरात एकटीच राहणारी वृद्ध महिला .मात्र तिला आज पर्यंत कुठल्याह लोकप्रतिनिधी नि भेट दिली नाही कि तिचे दुःख विचारले नाही . आज पर्यंत तिला कुठल्याही सरकारी योजनेचा फायदा मिळालेला नाही.
       अश्या स्त्री च्या घरी जाऊन तिला साडीचोळी देऊन आपली दिवाळी साजरी करणाऱ्या किशोर भंडारी यांचं गावात कौतुक  होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या