ढाणकी प्रतिनिधी -
शहरापासून जवळ असलेल्या एका खेड्यात माणुसकी व नातेसंबंध ला काळिमा फसणारी घटना काल सायंकाळी साडेपाच च्या सुमारास घडली. लहान चिमुकली आपल्या घराजवळ खेळत असताना बावीस वर्षीय चुलत काकाने तिला चॉकलेट चे आमिष दाखवले व तिला जवळच्या शेताकडे घेऊन गेला व तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्या चिमुकलीला शेतात घेऊन जाताना गावातील एका नागरिकाने पहिले आणि हा मुलीला कोठे घेऊन जात आहे हे पाहण्यासाठी त्यांच्या मागे तो व्यक्ती गेला असता तो नराधम चिमुकली सोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न करत होता. तो व्यक्ती तिथे पोहचतात आरोपी घाबरून घटना स्थळावरून पळाला. घटनेची माहिती घरच्यांना कळताच त्यांनी बिटरगाव पोलीस स्टेशन गाठून घटनेची रीतसर तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाला गती दिली व 24 तासाच्या आत आरोपीला आदिलाबाद येथून अटक केली. आरोपीवर विनयभंग व पोक्ससो अंतर्गत गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास बिटरगाव पोलीस स्टेशन करत आहे.

0 टिप्पण्या