झाडांच्या पानांपासून अडद जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवल्या अनेक प्रकारच्या कलाकृती. कदम उपक्रमाच्या माध्यमातून वनस्पती व प्राण्यांचे महत्त्व घेतले समजून.


ढाणकी प्रतिनिधी 

             ह्युमाना पिपल टु पिपल इंडिया अंतर्गत मुळावा केंद्रातील जिल्हा परिषद शाळेमध्ये कदम स्टेप ऑफ कार्यक्रम सुरू असून सदर उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अक्षरज्ञान ,संख्याज्ञान व शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक वर्कबुकच्या साह्याने विद्यार्थ्यांकडून सोडवून घेऊन त्यांना वेळोवेळी याबाबत मार्गदर्शन केले जाते.

     या सोबतच कदम  या उपक्रमामध्ये थीम या पुस्तकाच्या माध्यमातून माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अडद येथील विद्यार्थ्यांनी वनस्पती च्या पानांपासून अनेक प्रकारच्या प्राण्यांची कलाकृती बनवत प्राण्यांचे व झाडांचे महत्त्व समजावून घेतले. यावेळी विद्यार्थ्यांना शाळेचे मुळावा केंद्राचे केंद्रप्रमुख गायकवाड सर, मुख्याध्यापक भोने सर ,सहशिक्षक नानवटे सर व कदम एक्सलेटर राहुल मोहितवार यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या