ढाणकी प्रतिनिधी -
शहरांमध्ये बऱ्याच अवधीनंतर क्रिकेटचे खुल्या सामन्याचे आयोजन करण्यात आले असल्याने क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हे सामने दिनांक 5 फेब्रुवारीपासून सुरू होत असून दत्त मंदिर टेंभेश्वर नगर मैदानात खेळले जाणार आहेत.
51000 चे प्रथम पारितोषिक, 41111 द्वितीय पारितोषिक, 31001 तृतीय पारितोषिक व 21000चतुर्थ पारितोषिक हे या सामन्याचे आकर्षण आहे. या सामन्यात प्रवेश घेण्याची फी 2000 रु समिती ने ठेवली आहे.
शहरातील मॉर्निंग क्रिकेट क्लबने या सामन्यांचे आयोजन केले. विशेष म्हणजे हा क्लब टेंभेश्वर नगर येथील मैदानात नियमित सराव करत असून खेळाचे महत्व हे युवा पिढीमध्ये रुजवण्याचे मोठे कार्य करत आहे.
या खुल्या सामन्यांमध्ये जास्तीत जास्त क्रिकेट प्रेमींनी आपल्या चमू सह सहभाग नोंदवावा व अधिक माहिती साठी 8421752358, 9158262740, 8308959570, 8857849020 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष जॉन्टी विणकरे यांनी केले आहे.
.jpeg)
0 टिप्पण्या