महिल्यांच्या उन्नती साठी कार्य करणाऱ्या धान फौंडेशन ची वार्षिक महासभा व पदयात्रा संपन्न


हिंगोली प्रतिनिधी -

महिलांना आर्थिक सक्षम बनवत प्रगतीचे मार्ग खुले करणाऱ्या धान फाउंडेशन हिंगोली ची वार्षिक महासभा व पदयात्रा 

25 नोव्हेंबर रोजी पार पडली. यावेळी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एचडीएफसी बँक मार्फत लाईफ प्रकल्प व धान फौंडेशन अंतर्गत आकाशझेप कलंजियम महिला महासंघ हिंगोली ची वार्षिक महासभा व पदयात्रा चे आयोजन करण्यात आले होते.

या पदयात्रा चे उद्घाटन मा.विशाखा धुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक भरोसा सेल हिंगोली यांच्या शुभ हस्ते करण्यात आले . पदयात्रा मध्ये महिला बचत गट,महिला सक्षमीकरन,बचत,इत्यादि विषयीचे घोषणा चे पत्र घेऊन रेल्वे उड्डाण पूल ते सुखदा मंगल कार्यालय पर्यंत पदयात्रा निघाली होती.

धान फौंडेशन अंतर्गत आकाशझेप कलंजियम महिला महासंघ हिंगोली ची वार्षिक महासभा ही सुखदा मंगल कार्यालय येथे आयोजित कण्यात आली होती. उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना अनिल दवणे (तालुका समन्वयक) धान फौंडेशन यांनी केली. धान फाउंडेशन ची स्थापना 02 ओक्टोंबर 1997 रोजी झाली असून,आकाशझेप कलंजीयम महिला महासंघ हिंगोली 2011 पासून महिला बचत गट च्या माध्यमातून माहीलाचे बचत गट तयार करणे,त्यांना लघु लघु उद्योग विषयी प्रशिक्षण देणे, आर्थिक साक्षरता विषयी माहिती देणे,शेती उपयुक्त औजारे आणि सेंद्रिय शेती,गांडूळखत,विविध प्रकारचे प्रशिक्षण,आरोग्य,विमा,बँक मार्फत कर्ज उपलब्ध करून देणे,कृषि विभाग,केव्हीके,आरोग्य विभाग,समाज कल्याण कार्यालय,RSETI इत्यादी कार्य करत असून या मुळे महिला आर्थिक सक्षम होऊन समाजात ताठ मानेने जगत आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटक मा.शिवराज घोरपडे (जिल्हा कृषि अधीक्षक हिंगोली)यांनी  केले तसेच कृषि विभाग मार्फत योजना आणि महिला सक्षमिकरण आणि सेंद्रिय शेती विषयी त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच मा.नामदेव कोरडे (तालुका आरोग्य अधिकारी हिंगोली) यांनी आरोग्य विभागा मार्फत योजना व  आरोग्य राहण्या विषयी मार्गदर्शन  केले. प्रा.रोहिणी शिंदे (शास्त्रज्ञ गृह विभाग केव्हीकेतोंडापुर) यांनी केव्हीके मार्फत विविध प्रकारचे प्रशिक्षण व मार्गदर्शन आणि महिलांना शेती उपयुक्त साहित्य विषयी माहिती सांगितली.मा.मीराताई कदम (आदर्श शिक्षिका तथा समाजसेविका) यांनी महिला सक्षमीकरण विषयी मार्गदर्शन केले. मा.शशिकांत सावंत (एल डी एम. एसबीआय हिंगोली) यांनी आर्थिक साक्षरता आणि बँक मार्फत जीवन विमा विषयी मार्गदर्शन केले. मा.अनुराधा मॅडम (महिला व बाल कल्याण विभाग हिंगोली) यांनी महिलांना बाल विवाह आणि कुटुंबिक अत्याचार विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात  उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते शिलाईमशीन प्रशिक्षण प्रमाणपत्र,कॅनरा बँक मार्फत बचत गटांना मजुरीपत्र,RFशेळी पालन करिता,महिला बचत गटांना उत्कृस्ट कार्य करणार्‍या गटांचा सत्कार करून प्रमाणपत्र देण्यात आले.  तसेच हिंगोली टिमचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम ला मा.धनाजी बोईले,RSETI संचालक, वाठोरे सर म.व.बाल कल्याण विभाग,मा.भागवत बंन्साळे कॅनरा बँक  हिंगोली,नितिन खडके,गजानन पाटील,विकास हांडे,मंन्मत कुलकर्णि,हनुमान जगताप,नामदेव सोळंके, बालासाहेब डोंगरे,सर्व कार्यकारणी(BOD) सर्व सहयोगिनी आणि बचत गटातील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी हिंगोली टीम ने विशेष मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या