ढाणकी प्रतिनिधी -
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभामंडपात पार पडलेल्या काॅंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ढाणकीतील प्रतिष्ठित,मात्तबर तरूणांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश करून राहूल गांधीच्या भारत जोडो यात्रेला समर्थन दिले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी उमरखेड काॅंग्रेस ता.अध्यक्ष दत्तराव शिंदे होते तर प्रमुख उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील, जिल्हा सरचिटनीस किशोर ठाकुर, ढाणकी न पचे स्वीकृत सदस्य शेख खाजा भाई, ढाणकी शहर अध्यक्ष तथा प्रदेश समन्वयक अमोल तुपेकर, माधव अलकटवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनय उर्फ बंडू कोडगीरवार, रुपेश भंडारी, ढाणकी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष बंटी वाळके, ढाणकी न.प.चे उपाध्यक्ष शेख जहीर शेख मौला, अल्प संख्याक ता.अध्यक्ष हमीद भाई, गजानन मिटकरे, बाबुराव नरवाडे, साजीद भाई, ढाणकी शहर महिला अध्यक्ष सुनिता घोडे, संगीता गुडेटवार, शारदा नंदु सुरोशे इ.प्रमुख अतिथी होते.
या कार्यकर्ता मेळाव्यात गजानन गंगाधर मिटकरे, बालाजी माधव अलकटवार, साजीद कुरेशी ,खंडेराव लकडे, कृष्णा अक्कावार, अन्सार खाॅ हबीबखाॅ पठाण, विनोद सावतकर, अमोल सावतकर, इसा खाॅ फकीरखाॅ पठाण, अहेमदखाॅ हैदरखाॅ पठाण इत्यादी तरूणांनी काँग्रेस विचार धारेला स्वीकारले व पक्षात प्रवेश केला. या तरुणांच्या पक्षात प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला एक नवी बळकटी आली असून याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला नक्कीच होईल.
यावेळी किशोर ठाकूर, हमीद भाई इत्यादी वक्त्यांची मार्गदर्शन पर भाषने केली . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जब्बार पठाण यांनी केले तर आभार अमोल तुपेकर यांनी मानले. यावेळी ढाणकी शहर व परीसरातील काॅंग्रेस कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थिती होते.
गजानन मिटकरे यांच्या पक्षप्रवेशाने पक्षाला एक नवचेतना मिळाली असून येणाऱ्या काळात पक्ष त्यांच्यावर शहरातील एक जबाबदारीचे पद देणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात यावेळी कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

0 टिप्पण्या