बोरी येथे वीज पडून बैलाचा मृत्यू, शेतकऱ्याचे मोठे नुकसान.


ढाणकी प्रतिनिधी : 

   आज झालेल्या पावसामुळे दुपारी 4वाजता बोरी(चा) ता. उमरखेड यवतमाळ येथील शेतकरी प्रकाश उत्तमराव माने यांच्या शेतात बैल चरत असताना अचानक परतीचा पाऊस पडला. त्याचबरोबर विजाचा कडकडाटात बैलावर वीज कोसळली त्यामध्ये एका बैलाचा मृत्यू झाला. यावर्षी पावसाने कहर केला. सोयाबीन पिकाची अतोनात नुकसान झाले त्यामध्ये मेटाकुटीला  शेतकरी आला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्याचा आधार असलेला बैलाचा मृत्यू वीज पडून मृत्यू झाल्यामुळे शेतकरी हातबल झाला. पुढील शेतीचे काम कसे करावे हे प्रश्न शेतकर्यां समोर उभा राहिलाआहे.  त्या बैलाची अंदाजे किंमत 60 हजार होती त्याची उणीव कशी भरून काढावी असा प्रश्न आता उभा आहे. या बाबीकडे शासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्याकडून होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या