स्वातंत्र्या नंतर प्रथमच पोहचली गोविंदपूर येथे बस.


 ढाणकी प्रतिनिधी

 एकीकडे भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना तालुक्यातील गोविंदपुर येथे अद्यापही महामंडळाच्या बसचे आगमन झाले नव्हते इतक्या मोठ्या दीर्घ कालावधीनंतर आज प्रथमच गोविंदपुर मध्ये लालपरी चे आगमन झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. आजपर्यंत तेथील नागरिकांना खाजगी वाहनांचा आश्रय घ्यावा लागत होता. दवाखाना असो की मग शिक्षण नागरिकांना दुसरा पर्याय नव्हता. गावातील नागरिकांच्या कित्येक दिवसाच्या संघर्षाला यामुळे यश येऊन अखेर गोविंदपुर मध्ये एसटी बस आली. यावेळी  चालक व वाहकांचा शाल व श्रीफळ देऊन गावकऱ्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.


    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या