गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये बिटरगांव बु ते ढाणकी मार्गाची नोंद करण्याची नागरिकांची मागणी. नऊ किमी अंतरासाठी एक तासाचा प्रवास.



ढाणकी प्रतिनिधी 

 बिटरगाव बु ते ढाणकी मार्गाची संपूर्णतः चाळणी झाली.रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्यांना वाहने कशी अन् कुठुन चालवायची या विचारातच वाहनधारकांची मानसीकता खराब होत असुन त्यांची बौद्धिक क्षमता कमी होऊन चिडचिड पणा वाढत चालला मनक्याचे आजारात वाढत होत आहे.आजारी व्यक्ती या रस्त्यावर चार चाकी वाहनातून प्रवास करत असाल तर यमदूत आधीच दार उघडून बसलेला रुग्णांना दिसत आहे.शाळेतील विद्यार्थ्यांना प्रवास करत असताना धुमकेतूचा अशी ओळख रस्त्याची झाली आहे.या रस्त्यासाठी निवेदन दिले, उपोषण केले.या रस्त्यावर आई व बाळाला जिव गमवावा लागला.जिल्हा अधिकारी साहेबांच्या दरबारात या रस्त्यासाठी आदेश दिले.पण रस्ता अद्यापही झाला नाही. या रस्त्यासाठी नागरिक आता निःशब्द झाले.असुन आता या रस्त्याची दुरवस्था ची नोंद  जागतिक स्तरावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये  करण्यासाठी नागरिकांची आता मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या