ढाणकी प्रतिनिधी -
तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान असलेले हिंदूहृदय सम्राट, शिवसेना संस्थापक, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंती शिवसैनिकांनी उत्सहात साजरी केली.
येथील चौकात बाळासाहेबांच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी सकाळीच पुष्पहारांनी सजवले होते .मोठ्या उत्साहात शहरातील सर्व जेष्ठ तसेच शिवसैनिक एकत्र जमले व बाळासाहेबांना मानवंदना दिली. सोबतच नेताजी सुभाष चंद्र बोस यांना सुद्धा पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.यावेळी शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व प्रतिष्ठित नागरिक व महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
0 टिप्पण्या